मोठा दिलासा! महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Written by:Rohit Shinde
Published:
हवामान विभागाकडून काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील पावसाची तीव्रत कमी होणार आहे. यामुळे पुरग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळणार आहे.
मोठा दिलासा! महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

महाराष्ट्रातील पावसाबाबत दिलासादायक अशा स्वरूपाची अपडेट समोर येत आहे. मराठवाड्यातील पावसाची तीव्रता 29 सप्टेंबर रोजी कमी होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने 7 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शिवाय या काळात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला देखील मोठा दिलासा मिळणार आहे. हवामान  विभागाने वर्तविलेल्या या नव्या अंदाजामुळे पुरग्रस्त भागाला खरंतर मोठा दिलासा मिळणार आहे.

मराठवाड्याला मोठा दिलासा

मराठवाड्यातील पावसाची तीव्रता 29 सप्टेंबर रोजी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र 29 सप्टेंबर रोजी फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उर्वरित 7 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांत मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली होती. परंतु 28 सप्टेंबर पासून पावसाची तीव्रता ओसरू लागली आहे. पुढील काही दिवस मराठवाड्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली असून तेथे यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबई, ठाणे, पालघरला धोका

मुंबईसह पालघर आणि ठाण्यातील काही भागांत नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. पुढील काही तास मुंबई शहर, उपनगरे सतेच आजूबाजूच्या ठाणे, कल्याण परिसरात मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. नागरिकांना या काळात विशेष सतर्कता बाळगावी लागणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या चारही जिल्ह्यांना हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रातील पाऊस ओसरणार 

एकूणच आगामी काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर पूर्णपणे ओसरण्याची शक्यता या निमित्ताने निर्माण झाली आहे. अतिवृष्टीने हैराण नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. शिवाय दुसरीकडे सरकारला पंचनामे करून मदत नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे. मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर पूर्णपणे कमी होण्याचा अंदाज आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews