Marathi News

लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच वेळी 3,000 येणार? सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित मिळण्याची चर्चा

Written by:Rohit Shinde
Published:
सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये एकत्रित जमा केला जाईल, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच वेळी 3,000 येणार? सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित मिळण्याची चर्चा

ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. सप्टेंबर महिन्याचा लाभ अद्याप न मिळाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये एकत्रित जमा केला जाईल, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार?

लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच नवरात्रोत्सवात संपताच हा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता सप्टेंबर महिन्याचा आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना 14 हप्ते मिळालेले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे एकत्रित 3,000 देखील खात्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकत्रित 3,000 खात्यामध्ये येणार?

लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना सहसा सणासुदीच्या काळात योजनेचा हप्ता दिला जातो. त्यामुळे आता दिवाळीच्या मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ दिला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाडक्या बहिणींना सहसा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर योजनेचा हप्ता दिला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाहीये. पण आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ई-केवायसीमुळे टेन्शन वाढलं!

लाडकी बहीण योजनेचे निकष डावलत लाभ घेणाऱ्या महिलांची धाकधुक वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाखो बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. त्यामुळे आता सरकारने योजनेच्या प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. लाभार्थी महिलेला आता स्वत:सोबत वडिलांची किंवा पतीची देखील ई केवायसी करावी लागणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews