Marathi News

बाईक टॅक्सी सेवेला आता नियम आणि अटींचे बंधन; प्रवाशांच्या सोयीसाठी महत्वाचं पाऊल

Written by:Rohit Shinde
Published:
बाईक टॅक्सी सेवा ही एक जलद, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची उत्तम सुविधा आहे. या सेवेचा प्रमुख फायदा म्हणजे ट्रॅफिकमध्ये वेळेची बचत. कमी भाडे आणि सहज उपलब्धता यामुळे ही सेवा सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरते.
बाईक टॅक्सी सेवेला आता नियम आणि अटींचे बंधन; प्रवाशांच्या सोयीसाठी महत्वाचं पाऊल

मुंबईत बाईक टॅक्सी सेवा ही एक वेगवान, किफायतशीर आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा आहे. ट्रॅफिकच्या गर्दीतून सहज मार्ग काढत बाईक टॅक्सी कमी वेळात ठिकाणी पोहोचवते. यामुळे वेळेची बचत होते आणि कमी दरात प्रवास शक्य होतो. ओला बाईक, रॅपिडो यांसारख्या अ‍ॅप्सद्वारे ही सेवा सहज बुक करता येते. ही सेवा विशेषतः एकट्या प्रवाशांसाठी उपयुक्त आहे. कामाच्या वेळेत, ऑफिस, रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी बाईक टॅक्सी उत्तम पर्याय आहे. पेट्रोल खर्च, प्रदूषण आणि ट्रॅफिकचा त्रास टाळण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरते. तरुण वर्गात हिची लोकप्रियता झपाट्याने वाढते आहे.

बाईल टॅक्सीला नियम आणि अटींचे बंधन

बाईक टॅक्सीच्या धोरणात व सेवांमध्ये आता महत्त्वाचे नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र परिवहन विभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. हे काही महत्वाचे नियम आणि अटी खालीलप्रमाणे

प्रवासी व चालक दोघांच्याही सुरक्षितता सुविधा सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक सुरक्षा मार्गदर्शक तत्वे.

बाईक टॅक्सीला आता पिवळ्या रंगाचे वाहन असणे बंधनकारक.

तसेच 12 वर्षा खालील मुलाला बाईक टॅक्सी वरून नेण्यास बंदी.

प्रवासादरम्यान प्रवासी व चालक या दोघांनाही स्वच्छ व पिवळ्या रंगाचे हेल्मेट घालणे सक्तीचे.

या व्यतिरिक्त चालक व प्रवासी यात विभाजक असावे संरक्षक कवच आणि जीपीएस असावे.

मुसळधार पाऊस किंवा वादळासारख्या परिस्थितीमध्ये बाईक सेवा रद्द करावी.

बाईक टॅक्सीचा प्रवास हा 15 किमी पेक्षा जास्त नसावा तसेच वेग kmp60h पेक्षा जास्त नसावा.

शहरातील नागरिकांना उपयुक्त सेवा

बाईक टॅक्सी सेवा ही एक जलद, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक प्रवासाची उत्तम सुविधा आहे. या सेवेचा प्रमुख फायदा म्हणजे ट्रॅफिकमध्ये वेळेची बचत. कमी भाडे आणि सहज उपलब्धता यामुळे ही सेवा सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरते. अ‍ॅपद्वारे बुकिंग केल्यामुळे सोयीनुसार प्रवास करता येतो. एकट्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत फायदेशीर आहे. पेट्रोलचा खर्च कमी होतो आणि वाहतुकीचा ताण टाळता येतो. पर्यावरणावर होणारे प्रदूषण कमी होते. ऑफिस, कॉलेज किंवा स्टेशनला पोहोचण्यासाठी ही जलद सेवा आहे. गर्दीच्या वेळीही सहज मार्ग उपलब्ध होतो. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाचवणारी ही सेवा मुंबईकरांसाठी फारच लाभदायक ठरते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews