मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची मोर्चेबांधणी, वॉर्डनिहाय आढाव्यासाठी संचलन समितीची घोषणा

Written by:Astha Sutar
Last Updated:
दक्षिण मध्य जिल्ह्याचा आढावा आ.प्रसाद लाड आणि माजी आमदार सुनिल राणे तर दक्षिण मुंबई जिल्ह्याचा आढावा मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची मोर्चेबांधणी, वॉर्डनिहाय आढाव्यासाठी संचलन समितीची घोषणा

Mumbai BJP  – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपाने रणनिती आखायला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या धरतीवर भाजपाने अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकरिता जिल्हाशः पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे.

सदस्यांना कामांच अहवाल सादर करावा लागणार

दरम्यान, आज निवडणूक संचलन समितीची ही घोषणा करण्यात आली असून एकुण 27 सदस्यांच्या या समितीमध्ये मुंबईतील आजी माजी आमदार, माजी नगरसेवक आणि महिला, युवा मोर्चा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले. या सदस्यांना 7 जुलै 2025 पर्यत भाजपा मुंबईं कार्यालयात अहवाल सादर करावा लागणार आहे.

कोणत्या नेत्यांवर जबाबदारी…

आढावा घेण्यासाठी उतर मुंबई जिल्हाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर आणि आमदार योगेश सागर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर उत्तर पश्चिम जिल्ह्याचा आढावा आमदार अमीत साटम आणि आ .विद्या ठाकृर घेणार आहेत. उत्तर पुर्व जिल्हाचा आढावा आ.मिहिर कोटेचा आणि माजी खासदार मनोज कोटक हे दोघे घेणार असून उत्तर मध्य जिल्ह्याची जबाबदारी आ.पराग अळवणी आणि आ.संजय उपाध्याय यांच्याकडे देण्यात आली आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews