BMC Election 2026 : शिवसेना नेत्याने सांगितलं, कोण होणार मुंबईचा महापौर; म्हणाले, ‘मराठी आणि हिंदू….’

Written by:Smita Gangurde
Last Updated:
कोण होणार मुंबईचा महापौर?
BMC Election 2026 : शिवसेना नेत्याने सांगितलं, कोण होणार मुंबईचा महापौर; म्हणाले, ‘मराठी आणि हिंदू….’

BMC Election 2026 : महानगरपालिकाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबईचा महापौर कोण होणार, याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. मुंबईचा महापौर मराठीचं होणार आणि तो ठाकरे-मनसे युतीचा असेल असं आज राज ठाकरे यांनी वचननामा जाहीर करताना म्हटलं. दरम्यान शिवसेना नेत्यांनीही मुंबईचा महापौर कोण होणार याबाबत वक्तव्य केलं आहे.

कोण होणार मुंबईचा महापौर ? शिवसेना नेते काय म्हणाले?

शिवसेना नेते संजय निरुपम यांनी रविवारी ३ जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, मुंबईचा महापौर महायुतीचा होईल आणि याचा निर्णय मराठी माणसच घेतील. मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच असेल. याबाबत कोणतंही दुमत नाही.

संजय निरुपम पुढे म्हणाले, आगामी मुंबई महानगरपालिकेत महायुतीचं विजय निश्चित आहे आणि याचा निर्णय मराठी भाषिक जनता करेल. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बीएमसीचा २५ वर्षांचा कार्यकाळ अयशस्वी असल्याचं म्हटलं.

२५ वर्षे उद्धव ठाकरेंनी काहीच केलं नाही….

याशिवाय शिवसेना नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर थेट प्रहार केला. ते पुढे म्हणाले, त्यांनी तब्बल २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर शासन केलं. मात्र इतक्या मोठ्या कार्यकाळात शहराचा विकास होऊ शकला नाही. ते पुढे म्हणाले, २५ वर्षांत मुंबईकरांना ना शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं ना पुरेसा जलसाठा मिळू शकला. रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रुग्णालयं व्यवस्थितपणे सुरू नाही आणि शाळांची परिस्थितीही चांगली नाह

Follow Us :GoogleNews