Marathi News

खासगी टेलिकॉम कंपन्यांना BSNLचा धक्का; लवकरच सुरू होणार 5G सेवा!

Written by:Rohit Shinde
Published:
बीएसएनएल लवकरच Q 5G नावाने आपली 5G सेवा सुरू करत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना जरी फायदा होणार असला तरी टेलिकॉम कंपन्यांना आता स्पर्धा करावी लागणार आहे.
खासगी टेलिकॉम कंपन्यांना BSNLचा धक्का; लवकरच सुरू होणार 5G सेवा!

सध्या BSNL चे 70 हजारांहून अधिक मोबाईल टॉवर्स देशभरात कार्यरत आहेत. Q-5G च्या माध्यमातून BSNL देशात स्वस्त आणि स्वदेशी तंत्रज्ञानाधारित 5G सेवा देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे यापुढे ग्राहकांना जलद आणि किफायतशीर इंटरनेट सेवा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील खासगी टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा वाढीस लागून सेवेचा दर्जा सुधारणाच्या शक्यता वर्तवली जात आहे.

BSNL ची Q 5G सेवा लवकरच

सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने त्यांच्या 5G सेवेची सर्व तयारी पूर्ण केली असून, आता या सेवेचं नावही निश्चित केलं आहे. BSNL च्या 5G सेवेचं नाव Q-5G असं ठेवण्यात आलं आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून याची घोषणा केली असून, काही दिवसांपूर्वी त्यांनी ग्राहकांना या सेवेच्या नावासाठी सुचना मागवल्या होत्या.

1 लाख मोबाईल टॉवर्स कार्यान्वित

केंद्रीय संचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी अलीकडेच सांगितले की, देशभरात 1 लाख मोबाईल टॉवर बसवण्याचं काम यशस्वीरीत्या पूर्ण झालं आहे. यानंतर आणखी 1 लाख नवीन 4G/5G मोबाईल टॉवर्स बसवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरीची वाट पाहत आहोत. हे टॉवर्स बसवले गेल्यानंतर देशातील कोट्यवधी ग्राहकांना उत्तम नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळेल.

बीएसएनएलच्या एंट्रीचे फायदे

बीएसएनएल 5G टेलिकॉम सेवा भारतीयांसाठी अनेक फायदे घेऊन आली आहे. या सेवेच्या माध्यमातून जलद इंटरनेट स्पीड, उत्कृष्ट कॉल क्वालिटी, आणि कमी लेटंसी यांचा अनुभव घेता येतो. शिक्षण, आरोग्यसेवा, शेती आणि उद्योग क्षेत्रात 5G तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती घडू शकते. ग्रामीण भागांपर्यंत डिजिटल सुविधा पोहोचवण्याचे बीएसएनएलचे योगदान महत्त्वाचे ठरेल. देशी सेवा प्रदाता असल्यामुळे डेटा सुरक्षितताही अधिक विश्वासार्ह आहे. स्टार्टअप्स, नवउद्योजक आणि विद्यार्थ्यांसाठी ही सेवा नवसंधी घेऊन येते. त्यामुळे बीएसएनएल 5G ही डिजिटल भारताच्या दृष्टीने एक महत्त्वाची पायरी ठरते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews