Candela Boats In Mumbai: मुंबईच्या समुद्रात फ्लाईंग बोटची एंट्री होणार; कॅन्डेला फ्लाईंग बोट नेमका विषय काय?

Written by:Rohit Shinde
Published:
कॅन्डेला कंपनीच्या हायड्रोफॉईल इलेक्ट्रिक बोट मुंबईच्या समुद्रात दाखल होणार आहेत. मंत्री राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली.
Candela Boats In Mumbai: मुंबईच्या समुद्रात फ्लाईंग बोटची एंट्री होणार; कॅन्डेला फ्लाईंग बोट नेमका विषय काय?

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून अलिबाग किंवा एलिफंटाला जाण्यासाठी जुन्या पारंपारिक बोटीतून तुम्ही प्रवास केला असेल. पण आता लवकरच मुंबईत जलवाहतुकीत क्रांती होणार आहे. कारण, मुंबईत इलेक्ट्रिक बोट दाखल होणार आहेत. या बोटींची खास बाब म्हणजे त्यांची रचना आहे. या बोटींची रचना अशी आहे की, लाटांचे धक्के सुद्धा जाणवणार नाहीत आणि आवाजही होणार नाही.

लवकरच कॅन्डेला फ्लाईंग बोट मुंबईत

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानानेयुक्त बोटी लवकरच मुंबईत दाखल होतील. यामुळे मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात नवी क्रांती होईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मंत्री राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटींची सविस्तर पाहणी केली.

कॅन्डेला बोटीची नेमकी काय वैशिष्ट्ये?

या भेटीदरम्यान त्यांनी बाल्टिक समुद्रावर Candela कंपनीच्या C8 आणि P12 या अत्याधुनिक बोटींची सफर केली. या बोटी पाण्यावर glide होणाऱ्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून, वेगवान, पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम आहेत. मेरिटाईम बोर्डाकडून 15 इलेक्ट्रिक बोटींची ऑर्डर देण्यात आली आहे. ही बोट सामान्य नाहीये तर तिच्या वैशिष्ट्यांमुळे तिला फ्लाईंग बोट सुद्धा म्हणतात. ही बोट ठराविक वेगावर पोहोचल्यावर बोटीच्या खाली असलेल्या दोन लांब फॉईल्स या बोटीच्या मुख्य भागाला वर उचलतात. यामुळे बोट एक प्रकारे फ्लाईंग करु लागते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews