Marathi News

‘अमृता वहिनींना कोणतं गाणं डेडिकेट कराल’? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजय देवगण-तब्बूचं ते सुपरहिट गाणं!

Written by:Smita Gangurde
Last Updated:
महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध रेडिओ वाहिन्यांच्या सहा रेडिओ जॉकींनी प्रकट मुलाखत घेतली. रेडिओवरील संगीत ऐकणे, गाणे लिहिणे आदी छंदाविषयी मुख्यमंत्र्यांनी मनमोकळा संवाद साधला.
‘अमृता वहिनींना कोणतं गाणं डेडिकेट कराल’? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजय देवगण-तब्बूचं ते सुपरहिट गाणं!

जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मुलाखत घेण्यात आली. देशातील प्रसिद्ध पाच रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खा मुलाख घेतली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रेडिओचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं.

अजय देवगण-तब्बूचं ते प्रसिद्ध गाणं कोणतं?

यावेळी एका रेडिओ जॉकींनी मुख्यमंत्र्‍यांना एक प्रश्न विचारला. तुम्ही अमृता फडणवीसांना कोणतं गाणं डेडिकेट कराल, यावर मुख्यमंत्र्‍यांनीही अत्यंत रंजक असं उत्तर दिलं. ते म्हणते तशी अनेक गाणी आहेत. आमचं अरेंज मॅरेज होतं. ९० च्या दशकात आम्ही महाविद्यालयात होतो. त्यामुळे ती गाणी मला जास्त भावतात. त्या काळातील राह मे उनसे मुलाकात हो गई, जिससे डरते थे वही बात हो गई हे गाणं मी अमृताला डेडिकेट करतो असंही ते म्हणाले. अजय देवगण आणि तब्बू अभिनीत विजयपथ हे गाणं अजूनही संगीतप्रेमींच्या आवडत्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळतं. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही हे गाणं खास आहे.

रेडिओ तणावमुक्तीचं काम करते..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओचं महत्त्व ओळखून देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी मन की बात हा कार्यक्रम सुरू केला. रेडिओ केवळ संगीत ऐकण्याचे साधन नाही, तर संवादाचेही माध्यम होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले, अशा शब्दात पुन्हा एकदा रेडिओचे महत्व मुख्यमंत्री फडणवीस यांनी विषद केले.
रेडिओवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी रेडिओवरील कार्यक्रमांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भागही बनविले आहे. त्यामुळे रेडिओचे महत्व कधीही कमी होणार नाही, तसे असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

 

Follow Us :GoogleNews