CM Devendra Fadnavis : ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्रा’चं ध्येय, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

Written by:Smita Gangurde
Last Updated:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' अभियानाअंतर्गत 1 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी वृक्षारोपण करून 9 वेगवेगळ्या ठिकाणी होणार्‍या वृक्षारोपणाचे उद्घाटन केले.
CM Devendra Fadnavis : ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्रा’चं ध्येय, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

राज्यातील वनाच्छातील परिसर वाढविण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानाची घोषणा केली होती. या अभियानाअंतर्गत राज्यभरात ११ कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याचा गडचिरोली येथे शुभारंभ झाला आहे. वृक्षारोपण ही लोकचळवळ झाली तर ती मोहीम यशस्वी होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. पर्यावरण चांगलं राखण्यासाठी वनाच्छातील परिसर महत्त्वाचा असतो. राज्यातील ३३ टक्के वनाच्छदनाचं उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी पुढील किमात २० वर्षे ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ चळवळ राबवणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य सरकार पावलं उचलत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून वृक्षारोपणाचं उद्घाटन…

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानाअंतर्गत 1 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी वृक्षारोपण करून 9 वेगवेगळ्या ठिकाणी होणार्‍या वृक्षारोपणाचे उद्घाटन केले. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार परिणय फुके, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार धर्मरावबाबा आत्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.

हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र ही चळवळ… – मुख्यमंत्री फडणवीस 

२०१४ ते २०१९ आपण ५० कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला होता. तो यशस्वीपणे पार पडला. त्याचं प्रत्यंतर २०१९ साली केंद्र सरकारने राज्यांचा वनांसंदर्भातील अहवाल जाहीर केला तेव्हा महाराष्ट्रात वनाच्छादन वाढलेलं दिसून आलं. आता पुन्हा एकदा आपली वाटचाल त्याच दिशेने सुरू केली आहे. राज्यात या वर्षी ११ कोटी झाडं लावणार आहोत. पुढच्या वर्षी २५ कोटी आणि त्याच्या पुढच्या वर्षी अधिक वृक्षरोपण करण्यात येईल. गडचिरोलीत चांगलं वनाच्छादन आहे. इथं चांगली वनं आहेत. इथं वृक्षारोपण केलं नाही तर कदाचित या जिल्ह्याच्या विकासासोबत पर्यावरण पूरक असणं आवश्यक आहे. गडचिरोलीला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणत होतो, पण आता तो आपल्याला पहिला जिल्हा करायचा आहे. त्य़ामुळे गडचिरोलीत १ कोटी वृक्षलागवडीचं ध्येय ठेवलं आहे.

Follow Us :GoogleNews