लाडकी बहीण योजनेच्या e-KYC बाबत आदिती तटकरेंची महत्वाची सूचना; अन्यथा 1,500 रू. बंद होणार!

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी महिलांना महत्वपूर्ण आवाहन केले आहे. 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी पूर्ण करून घ्या, असे आवाहन तटकरेंनी महिलांना केले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या e-KYC बाबत आदिती तटकरेंची महत्वाची सूचना; अन्यथा 1,500 रू. बंद होणार!

लाडकी बहीण योजनेचे निकष डावलत लाभ घेणाऱ्या महिलांची धाकधुक वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाखो बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. त्यामुळे आता सरकारने योजनेच्या प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. लाभार्थी महिलेला आता स्वत:सोबत वडिलांची किंवा पतीची देखील ई केवायसी करावी लागणार आहे. मात्र ही ई-केवायसीची प्रक्रिया 18 नोव्हेंबरच्या आधी पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही मुदतवाढ मिळण्याची चिन्हं सध्या दिसत नाहीत.

आदिती तटकरेंचे महिलांना काय आवाहन?

आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना ई केवायसी करने बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र आता या ई केवायसीची मुदत काही दिवसातच संपणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने तात्काळ ही केवायसी करून घ्यावी लागणार आहे. अन्यथा अनुदान बंद होण्याचे देखील शक्यता आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून माहिती दिली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली. तसेच 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध आहे. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. आतापर्यंत बहुतांशी लाडकी बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र उर्वरित लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. असे मी आवाहन करते असे यावेळी तटकरे म्हणाल्या.

बहिणींनो, ई-केवायसी पूर्ण करून घ्या!

योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. केवळ लाभार्थी महिलेचेच नाही, तर त्या महिलेचे पती किंवा वडिलांचे ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, सरकार आता लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासोबतच तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न पडताळून पाहणार आहे.

  • लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
  • संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
  • तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.

यामध्ये विवाहीत महिलांना आपल्या पतीची आणि मुलींना आपल्या वडिलांची ई-केवायसी देखील करून घ्यावी लागणार आहे. निर्धारीत मुदतीमध्ये प्रक्रिया पार पाडावी लागेल.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews