राज्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार असली तरी मराठवाडा आणि विदर्भ भागात अद्याप पावसात सातत्य पाहायला मिळत नाही. काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता देखील आहे. अशात पुढील आठवडाभरासाठीचा हवामान विभागाचा पावसाचा अंदाज समोर आला आहे. यामध्ये कमी अधिक फरकाने राज्यभरात पावसाची संततधार राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शिवाय या काळात कोकणपट्ट्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने नेमका काय अंदाज काय वर्तवला आहे, ते अधिक सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू…
राज्यात पावसाचा जोर वाढणार!
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, विदर्भातदेखील पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान बदलामुळे राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची स्थिती बदलू शकते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/kIvRBpyCXY
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 5, 2025






