मोठी बातमी; न्यायालयाकडून मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या परवानगीत वाढ, नेमका किती वेळ वाढला?

Written by:Rohit Shinde
Published:
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला आणखी एक दिवसाची मुदतवाढ कोर्टाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जरांगेंना आणखी एक दिवसाची मुदतवाढ मिळाली असल्याने तूर्त काहीसा दिलासा मिळाला आहे.
मोठी बातमी; न्यायालयाकडून मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या परवानगीत वाढ, नेमका किती वेळ वाढला?

मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानातील उपोषणाबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी एक दिवसाची परवानगी दिली होती. मात्र, आज त्याला एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे सरकार देखील या निर्णयाने समाधानी असल्याचे सांगण्यात येत आहे, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या बाबतीत सकारात्मकता दर्शविली होती.

जरांगेंच्या आंदोलनाला कोर्टाची मुदतवाढ

बई पोलिसांना परवानगीसाठी अर्ज मिळाला आहे आणि त्यावर विचार केला आहे. त्यानुसार एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं अशीही सुत्रांची माहिती आहे. आंदोलनाला आधी फक्त एका दिवसाची परवानगी दिली होती. मात्र, जरांगे पाटील यांनी आमच्या सर्व मागण्या या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असं विधान केलं होतं. तसंच, जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनासाठी अर्ज करण्यात आला होता, आता त्या अर्जावर विचार सुरु आहे. आता किती दिवसांची मुदतवाढ मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या

  • मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, ही मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी आहे.
  • हैदराबाद गझेटियर, सातारा गॅझेटीयर, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आले आहेत.
  • सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे आरक्षणात घेण्याची मागणी.
  •  सरसकट गुन्हे मागे घेणार होते. त्यासंदर्भात आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.
  • ओबीसी कोट्यातून कायद्याच्या चौकटीत टीकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळावे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews