मोठी बातमी! कच्च्या तेलाचे दर घसरले; भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार?

Written by:Rohit Shinde
Published:
कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. आगामी काही काळात भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर नेमका काय परिणाम होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. देशभरातील नागरिकांसाठी किंमती कमी झाल्या तर हा मोठा दिलासा ठरू शकतो.
मोठी बातमी! कच्च्या तेलाचे दर घसरले; भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार?

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेली घसरण ही भारतासारख्या आयात-निर्भर देशासाठी महत्त्वाची बाब ठरते. भारतात वापरले जाणारे बहुतांश कच्चे तेल परदेशातून आयात केले जाते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती कमी झाल्यास थेट परिणाम पेट्रोल व डिझेलच्या दरांवर होतो. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यास देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळते, महागाई कमी होते आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता वाढते. आता कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर याचा नेमका काय परिणाम होतो, भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर घटतात, का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये घसरण

कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या प्रति बॅरल $64 पर्यंत दर खाली आले आहेत. ही गेल्या चार महिन्यांमधील सर्वात नीचांकी नोंद आहे. या घसरणीमागे जागतिक ‘शटडाऊन’ हे एक कारण असू शकते असे बोलले जात आहे. 2025 मधील कच्च्या तेलाच्या दरांमध्ये लक्षणीय बद ल दिसून आले आहेत. 16 जानेवारी रोजी दर $82 होते, तर 31 मार्चला ते $74 पर्यंत खाली आले. 8 एप्रिल रोजी $62, 5 मे रोजी $60 आणि 18 जून रोजी पुन्हा वाढून $77 झाले होते. आता 2 ऑक्टोबर रोजी ते $64 पर्यंत घसरले आहेत. कच्च्या तेलाच्या दरातील या घसरणीमुळे ‘खाजगिकर’णावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा हा थेट परिणाम आहे.

त्यामुळे आगामी काही काळात भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर नेमका काय परिणाम होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. देशभरातील नागरिकांसाठी किंमती कमी झाल्या तर हा मोठा दिलासा ठरू शकतो.

सध्या महाराष्ट्रात दरांची काय स्थिती?

राजधानी दिल्ली, मुंबई या शहरांशी तुलना करता सध्या पुण्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे दर चांगलेच वाढले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 104.88 रूपये तर डिझेल 91.37 रूपये प्रति लिटर या दराने विकले जात आहे. त्यामुळे पुणेकरांना पेट्रोल डिझेलसाठी राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. तरी गेल्या काही दिवसांत दर खाली आल्याचं चित्र आहे. उत्तर भारतातील बहुतांश शहरांत पुण्या सारखीच परिस्थिती आहे. नागपुरात पेट्रोल 104.32 तर डिझेल 90.55 रूपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews