मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एकूण या बैठकीत सात निर्णय घेण्यात आले. त्यातील सातपैकी तीन निर्णय हे नगरविकास विभागातील आहेत. तर मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून करवसुलीसाठी सरकार अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार केद्याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणे भरपाई देण्याच्या धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय कोणते?
– विधि व न्याय विभाग
चिखलोली-अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणार व त्याअनुषंगाने पदे मंजूर
– गृह विभाग
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्याच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजूरी.
– नगरविकास विभाग
नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या हस्तांतरणांसाठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता
– नगरविकास विभाग
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा. नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी क्षेत्रातील मालमत्ता करावरील दंड अंशतः माफ करून कर वसूलीसाठी व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय
– नगरविकास विभाग
नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार.
– महसूल व वन विभाग
भूमिसंपादन, पुनर्वसन पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 चे कलम-30(3), 72 व 80 मध्ये भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना आकारण्यात येणार्या व्याजदरांच्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय
– उच्च व तंत्रशिक्षण विभाग
लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय
नाराजी नाट्याचे पडसाद…
दुसरीकडे सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यभर साजरी झाली. चैत्यभूमीवर राज्य शासनाकडून जयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री, राज्यपाल, दोन उपमुख्यमंत्र्यांचे भाषणाचे नियोजन होते. परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषण करायला दिले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. आणि याचे आज पडसाद बैठकीदरम्यान पाहायला मिळाले. महायुतीत तीन पक्ष आहेत. एका घरात जास्त माणसं असली की, भांड्याला भांडे हे थोडेफार लागतेच. परंतु आमच्यात सर्व काही आलबेल आहे, असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराज नाट्यवर प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा
1Politics News : शरद पवार 2022 मध्येच NDA मध्ये येणार होते; संजय शिरसाट यांचा दावा
2अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय!!
3Parth Pawar : पार्थ पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष? शरद पवारही आग्रही असल्याची चर्चा
4Ajit Pawar Plane Accident : अजित पवारांच्या विमानात बॉम्ब?? नव्या संशयाने खळबळ