Marathi News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रती पंढरपुरात विठ्ठलाची पूजा; पत्नी लता शिंदे उपस्थित

Written by:Rohit Shinde
Published:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाले. प्रति पंढरपुरात पांडुरंगाची महापूजा केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रती पंढरपुरात विठ्ठलाची पूजा; पत्नी लता शिंदे उपस्थित

आज राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीनिमित्त वडाळ्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. पांडुरंगाला अभिषेक करत आरती संपन्न झाली. आषाढी एकादशीनिमित्त वडाळ्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. पांडुरंगाला अभिषेक करत आरती संपन्न झाली.

वडाळ्यातील विठ्ठल मंदिराचा कायापालट होणार!

एकनाथ शिंदे यांनी प्राचीन असलेल्या प्रति पंढरपूर मंदिराची महती सांगितली. संत तुकारामांनी बांधलेलं हे मंदिर परिसर सुशोभित करण्यासाठी तसेच येथे येणाऱ्या भाविकांकरता सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध देणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे आता आगामी काळात वडाळ्यातील या विठ्ठल मंदिराचा कायापालट होणार, हे मात्र नक्की.

शेतकऱ्यांना सुखी ठेव, शिंदेंची प्रार्थना

तसेच राज्यातील शेतकऱ्याला, बळीराजाला सुखी ठेव, भरपूर पाऊस पडू दे, भरपूर पीक येऊ दे असं साकडं शिंदे यांनी विठुरायाकडे केल्यानं म्हटलं आहे. त्यासोबत वारी, लाडकी बहिण सर्वांनाच सुखी ठेवण्याची प्रार्थनाही त्यांनी यावेळी केल्याचे सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी उपस्थित असून शिवसेने काही नेते, पदाधिकारीदेखील मंदिरात आल्याचे पाहायला मिळाले.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews