देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाही, ठाकरे गटाकडून ठाण्यात नितेश राणेंच्या विरोधात बॅनरबाजी

Written by:Astha Sutar
Published:
दोन वाघांनी एकत्र येणे महाराष्ट्राची गरज असल्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे "देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाही...मी तुषार दिलीप रसाळ... कैलासवासी दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता बाप" असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे.
देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाही, ठाकरे गटाकडून ठाण्यात नितेश राणेंच्या विरोधात बॅनरबाजी

Nitesh Rane Banner Thane – राजकीय वर्तुळातून एक मोठी व महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची राजकीय वर्तुळात चर्चा असताना, या एकत्र येण्यावरुन भाजपा आमदार व मंत्री नितशे राणेंनी टिका केली होती. एकाकडे २० आमदार आणि एका पक्षाकडे एकही आमदार नाही. त्यामुळं हे एकत्र आले तर आम्हाला याची खूप भीती वाटत आहे. अशी उपरोधिक टीका राणेंनी केली होती. या टिकेला आता ठाण्यात बॅनर लावून ठाकरे गटाने प्रतित्तर दिलं आहे.

फडणवीस हे माझे बाप नाही…

धाराशिव येथे नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाने ठाण्यात बॅनरबाजी केली होती. शिवसेना ठाकरे गटाकडून नितेश राणे यांना डिवचण्यात आले आहे. ठाण्यातील तीन नाका परिसरात हा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बॅनरवर दोन वाघांनी एकत्र येणे महाराष्ट्राची गरज असल्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे “देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाही…मी तुषार दिलीप रसाळ… कैलासवासी दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता बाप” असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. यातून राणेंवर अप्रत्यक्ष टिका करण्य़ात आली आहे.

बॅनर पालिका प्रशासनाने हटविला…

दरम्यान, धाराशिव येथे नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाने ठाण्यात बॅनरबाजी केली होती. शिवसेना ठाकरे गटाकडून नितेश राणे यांना डीवचण्यात आलेला बॅनर अखेर ठाणे महापालिका जाहिरात विभागाने काढल्याची माहिती समोर येत आहे. ठाण्यातील तीन नाका परिसरात हा बॅनर लावण्यात आला होता. मात्र आता हा बॅनर ठाणे महापालिका जाहिरात विभागाने काढला आहे. मात्र आता ठाकरे गटाने बॅनरवरुन बाप काढल्याने याला नितेश राणे किंवा नारायण राणे काय उत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews