धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीतील प्रमुख सण आहेत. धनत्रयोदशीला धन्वंतरिची पूजा करून आरोग्य आणि संपत्तीची प्रार्थना केली जाते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी व्यापारी नवीन वर्षाची सुरुवात करतात आणि पती-पत्नी एकमेकांप्रती सन्मान व्यक्त करतात. भाऊबीज हा प्रेम आणि आपुलकीचा सण असून या दिवशी बहिणी आपल्या भावाला आरती करून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करतात. महाराष्ट्रात या सणांना मोठे सांस्कृतिक आणि कौटुंबिक महत्व आहे. घरात दिव्यांची सजावट, फटाके, आणि पारंपरिक खाद्यपदार्थांनी आनंदाचे वातावरण निर्माण होते. हे सण एकता, प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहेत.
सगळे शुभ-मुहूर्त आणि विधी
दिवाळीला लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि दिवाळी पाडवा या सणांना फार महत्त्व आहे. त्यानुसार, यंदा म्हणजेच 2025 च्या दिवाळीला हे सण नेमके कोणत्या दिवशी साजरे होणार आहेत तसेच यंदाची दिवाळी नेमकी कधी हे जाणून घेऊयात.
यंदाची दिवशी 18 ते 23 ऑक्टोबर 2025 या कालावधीत साजरी होणार आहे. त्यानुसार, 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. या दिवशी खरेदी आणि लक्ष्मी-कुबेर पूजेला महत्व आहे. खरेदीसाठी शुभ वेळ दुपारी 12:18 ते 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 पर्यंत आहे.
त्यानंतर, नरक चतुर्दशीचा दिवस असतो. या दिवसाला पहिली अंघोळ देखील म्हणतात. या दिवसाचं महत्त्व म्हणजे, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला. आणि त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरा केला. याच परंपरेनुसार, नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.
दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. यंदा 20 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन होणार आहे. पण लोकांमध्ये अजूनही गोंधळ आहे की दिवाळी 20 ऑक्टोबरला आहे की 21 ऑक्टोबरला. दिवाळी कार्तिक अमावस्येला साजरी केली जाते. यावर्षी अमावस्या 20 ऑक्टोबरला सुरू होऊन 21 ऑक्टोबरपर्यंत आहे. सूर्यास्तानंतर लक्ष्मीपूजन होत असल्याने दिवाळी 20 ऑक्टोबर म्हणजेच, सोमवारी साजरी केली जाईल.
22 ऑक्टोबर 2025 ला बालिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. नवविवाहित वधु-वरांसाठी हा दिवस फार खास असतो.
दिवाळीचा शेवटचा आणि भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव म्हणजेच भाऊबीजेचा सण साजरा करतात. या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि भावाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचं वचन देतो.
दिवाळीतील ‘हे’ महत्त्वाचे 5 दिवस
18 ऑक्टोबर 2025 – धनत्रयोदशी
20 ऑक्टोबर 2025 – नरक चतुर्दशी
21 ऑक्टोबर 2025 – लक्ष्मीपूजन
22 ऑक्टोबर 2025 – बलिप्रतिपदा/ दिवाळी पाडवा
23 ऑक्टोबर 2025 – भाऊबीज
खरंतर, दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांनाच दिवाळीची ओढ लागली असते. त्यामुळे राज्यासह देशभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात यंदा देखील साजरा होणार आहे. महाराष्ट्रात या सणांना मोठे सांस्कृतिक आणि कौटुंबिक महत्व आहे. घरात दिव्यांची सजावट, फटाके, आणि पारंपरिक खाद्यपदार्थांनी आनंदाचे वातावरण निर्माण होते. हे सण एकता, प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहेत.
टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.






