लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आता खरंतर एक मोठी अपडेट समोर येत आहे. महिलांच्या खात्यामध्ये नुकतेच 1,500 रूपये जमा झाले आहेत. ई-केवायसी न केलेल्या लाखो महिलांच्या पैशांचं काय होणार ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. योजनेच्या अंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता सरकारच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ई-केवायसी करण्यास सांगितले होते. 18 सप्टेंबर पासून ईकेवायसीची प्रक्रिया सुरू झाली होती. ईकेवायसी करम्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. ईकेवायसीची मुदत संपली आहे.
लाखो महिलांचा 1,500 चा लाभ बंद होण्याची शक्यता
दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलं होतं. त्याची मुदत काल ( 31 डिसेंबर)पर्यंतच होती. . खरंतर नोव्हेंबरपर्यंतच ई-केवायसीची मुदत होती, मात्र लाखो महिलांचे ई-केवायसी न झाल्याने ही मुदत वाढवण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले होते. आधी ईकेवायसीची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत होती, मग ती वाढवून 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पण त्यानंतरही अनेक महिलांना ई-केवायसी करण्याच अडचणी आल्याने ही मुदत वर्षाअखेरीस, 31 डिसेंबपर्यंत वाढवण्यात आली. काल अखेर ही मुदत संपली. त्यामुळे आता ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, त्यानंच या योजनेचा लाभ आणि पर्यायाने दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. उर्वरित महिलांना या योजनेला मुकावे लागू शकते. जवळपास 40 लाख महिला वंचित राहण्याची शक्यता आहे.
1,500 मिळाले; डिसेंबर-जानेवारीच्या हप्त्याचं काय?
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खात्यात पैसे मिळाल्याने लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. तुम्ही लाभार्थी असाल तर हे पैसे जमा झालेत की नाही ते ऑनसलाइनही चेक करू शकता. मात्र असे असले तरी डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे कधी मिलमार असा सवाल अनेकींच्या मनात आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, केवळ पात्र आणि पडताळणी पूर्ण झालेल्या महिलांनाच या योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल. त्यामुळे ज्या महिलांनी ईकेवायसी केली आहे आणि त्या नियमात, निकषात बसत असतील अशा सर्व महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्यांनी ईकेवायसी केले नाही त्यांची नावे योजनेतून वगळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना आता पुढच्या हप्त्याच्या वेळी धक्का बसण्याची शक्यता आहे.






