अवैध धर्मांतरण प्रकरणात छांगुर बाबाची नार्को टेस्ट होणार; छांगुर बाबाचे महाराष्ट्र कनेक्शन काय?

Written by:Rohit Shinde
Published:
हजारो लोकांचे बेकायदेशीरपणे धर्मांतर करणाऱ्या छांगूर बाबाचा रिमांड संपल्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
अवैध धर्मांतरण प्रकरणात छांगुर बाबाची नार्को टेस्ट होणार; छांगुर बाबाचे महाराष्ट्र कनेक्शन काय?

हजारो लोकांचे बेकायदेशीरपणे धर्मांतर करणाऱ्या छांगूर बाबाचा रिमांड संपल्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. तुरुंगात पाठवण्यापूर्वी चांगूर बाबाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अटकेनंतर, छांगूर बाबा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला आहे आणि त्याने आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये अवैध धर्मांतरण प्रकरणात छांगुर बाबाची एटीएसकडून नार्को टेस्ट केली जाणार आहे. शिवाय अनेक राज्यातील छांगुर बाबाच्या ठिकाणांवर ईडीचे धाडसत्र सध्या सुरू आहे.

एटीएस जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा आणि नीतू उर्फ नसरीन यांची नार्को-पॉलीग्राफिक चाचणी करू शकते. या चाचणीद्वारे, कस्टडी रिमांड दरम्यान नीतू आणि छांगूरकडून मिळालेल्या माहितीची सत्यता तपासली जाईल. त्यानंतर अवैध धर्मांतरणासंदर्भातील सत्य समोर येईल.

छांगुर बाबाच्या संपत्तीवर ईडीची टाच

आता केंद्रीय तपास संस्था अंमलबजावणी संचालनालय (ईडी) छांगूर बाबाच्या अफाट संपत्तीची चौकशी करेल, अशी माहिती समोर येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे पथक सकाळी ५ वाजता बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या छांगूर बाबाच्या १४ ठिकाणी पोहोचले. छांगूर बाबाच्या अफाट संपत्तीची ईडी चौकशी करत आहे. सात दिवसांच्या रिमांडची मुदत संपल्यानंतर, यूपी एटीएसने पुन्हा रिमांड अर्ज दाखल केला नाही. त्याऐवजी, त्याला थेट तुरुंगात पाठवण्यात आले. आता गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे यूपी एटीएस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल.

बेकायदेशीर धर्मांतराचे सिंडिकेट चालवणाऱ्या छागूर बाबाच्या अडचणी वाढत आहेत. गुरुवारी सकाळी केंद्रीय तपास यंत्रणा ईडी चांगूर बाबाच्या एकूण १४ ठिकाणी छापे टाकत आहे. यापैकी १२ ठिकाणे उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उत्तरौला भागात आहेत, तर दोन महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे हे अवैध धर्मांतरणाचे वारे अगदी महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

छांगूर बाबाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर

या हाय-प्रोफाइल धर्मांतर रॅकेटमधील प्रमुख आरोपी छंगूर बाबा हा भारत प्रतिकार संघाचा उत्तर प्रदेश अध्यक्ष होता. ही संघटना महाराष्ट्रातील नागपूर येथे स्थापन झाल्याची माहिती समोर येत आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आता या संघटनेच्या राज्यव्यापी नेटवर्कची चौकशी सुरू केली आहे. एटीएसचा असा विश्वास आहे की ही संघटना बेकायदेशीर धर्मांतरात देखील सहभागी असू शकते. त्यामुळे आता तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews