गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार, मंत्री नितेश राणे यांची माहिती

Written by:Astha Sutar
Published:
केवळ योजना राबवण्यावर विभागाचा भर नसून मत्स्य व्यवसायिकांचे आर्थिक सामर्थ्य वाढवणं हे देखील आमचं उद्दिष्ट आहे. विभागाच्या माध्यमातून जे काही सहकार्य हवे असेल ते करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले.
गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार, मंत्री नितेश राणे यांची माहिती

Nitesh Rane – मत्स्य व्यवसायाबबत एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. मत्स्यव्यवसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय उत्पादन वाढीसाठी सहकार्य करण्यात येईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मत्स्य व्यवसायिकांचे आर्थिक गणितं वाढवणे…

मंत्री नितेश राणे म्हणाले, केवळ योजना राबवण्यावर विभागाचा भर नसून मत्स्य व्यवसायिकांचे आर्थिक सामर्थ्य वाढवणं हे देखील आमचं उद्दिष्ट आहे. विभागाच्या माध्यमातून जे काही सहकार्य हवे असेल ते करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी व्यावसायिक संस्थांना दिले. बैठकीपूर्वी शर्व ईंनटरप्राईजेचे समीर पोतनीस यांनी बोटींची धडक टाळण्यासाठी भारतीय बनावटी शर्व एआयएस यंत्र बोटीवर बसविण्यासंदर्भात सादरीकरण केले.

मंत्रालयात दिंडोरी व पेठ तालुक्यातील गोड्या पाण्यातील मासेमारीच्या समस्या व त्यावर उपाययोजना याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, उपसचिव किशोर जकाते यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी व दिंडोरी व चंदनपुरी येथील मत्स्य व्यवसायिक संस्थचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वाढवण बंदरासाठी कुशल मनुष्यबळाची गरज…

दुसरीकडे जर शासनाने परस्पर आपल्या सहकार्यातून कुशल मनुष्यबळ तयार करून रोजगार निर्मिती केली तर राज्याच्या विकासाला नक्कीच अधिक चालना मिळेल शिवाय शासनाच्या विभागांना सहाय्य ठरेल असे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मत व्यक्त केले. बंदर आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता वारंवार भासत असते. सागरी वाहतूक आणि बंदर व्यवस्थापन मध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेवून जेएनपीटी, वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews