मुंबईतील नदी व नाल्यातून पावसाळापूर्व गाळ काढण्याचे आतापर्यंत ८२.३१ टक्के काम पूर्ण, उर्वरित गाळ काढण्‍यासाठी कामांना वेग

Written by:Astha Sutar
Published:
मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या अंतर्गत नदी स्वच्छता व वहन क्षमतेत वाढ करण्यात आलेय. पावसाचे आगमन वेळेपूर्वी झाल्‍यामुळं नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या कामांवर परिणाम झाला. जून २०२५ च्या पहिल्या आठवड्यात सर्व प्रमुख नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे पूर्ण झालीत. नदीतून गाळ काढण्‍यासाठी पथके व यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे.
मुंबईतील नदी व नाल्यातून पावसाळापूर्व गाळ काढण्याचे आतापर्यंत ८२.३१ टक्के काम पूर्ण, उर्वरित गाळ काढण्‍यासाठी कामांना वेग

BMC – मान्सून पूर्वीच पावसाने हजेरी लावत मुंबईची तुंबई केली आहे. त्यामुळं पालिका प्रशासन सतर्क झाले असून, पाणी तुंबू नये यासाठी उपाययोजना केल्या जाताहेत. दरम्यान, दरवर्षी वार्षिक उद्दिष्‍टापैकी पावसाळ्यापूर्वी ८० टक्‍के गाळ उपसा केला जातो. मुंबई महानगरातील मिठी नदीसह मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. या वर्षी पावसाळ्यापूर्वी एकूण ९ लाख ६८ हजार ००८ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. असं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

७ लाखापेक्षा अधिक मेट्रिक टन गाळ काढला…

दरम्यान, गाळ काढण्‍याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरु असून या कामी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीचा वापर केला जात आहे. या उद्दिष्‍टानुरूप, आतापर्यंत ७ लाख ९६ हजार ७६५ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ८२.३१ टक्के गाळ काढण्‍यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या कामात परिणामकारकता व पारदर्शकता यामध्ये वाढ होण्यास मोठी मदत होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निरिक्षणाद्वारे साधारणतः ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची आकारणी कंत्राटदारांकडून करण्यात आली आहे. अशी पालिकेनं दिली आहे.

गाळ काढण्‍याची कामांना वेग…

पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करुन गाळ उपशाचे दरवर्षाचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबईत दरवर्षी पावसाचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मिठी नदीसह मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. पावसाळा दरम्यान १० टक्के, तर उर्वरित कालावधीत १० टक्के गाळ उपसा केला जातो. पण आजपर्यंत ७ लाख ९६ हजार ७६४ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ८२.३१ टक्के गाळ काढण्‍यात आला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मार्च महिन्‍यात गाळ काढण्‍याची कामांना सुरुवात झाली.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews