मुंबईहून वाराणसी निघालेल्या विमानाला हवेत बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित फ्लाईटची तातडीने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटाने देश हादरलेला असतानाच आता देशातील देशातील 5 विमानतळे बाँम्बने उडवून देणार असल्याची धमकी मिळाली आहे. इंडिगो एअरलाइन्सला आज दुपारी 3.30 वाजता देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत मेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या पाच विमानतळांची नाव आहेत.
इमर्जन्सी लँडींगचं कारण नेमकं काय?
मुंबईहून वाराणसीच्या दिशेला निघालेलं विमान हवेत असताना ते विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. त्यामुळे या विमानाचं तातडीने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. तातडीने सुरक्षा यंत्रणा कामाला लागले आहेत. तसेच देशातील 5 महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळांना थेट बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. यामुळे कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या धमकीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता या प्रकरणात काय अपडेट येते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
देशातील 5 विमानतळे उडविण्याची धमकी
दिल्लीत बॉम्बस्फोट झाल्याचे प्रकरण ताजं असताना आता देशातील 5 विमानतळांना उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर आता सगळीकडे खळबळ उडाली असून सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, हा मेल कुणी आणि कुठून पाठवला हे अद्याप समजू शकलेले नाही. मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला.
विशेष म्हणजे दिल्लीत भ्याड हल्ला झाला आहे. दिल्लीत लाल किल्ला परिसरात आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या भ्याड हल्ल्यानंतर आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील पाच प्रमुख विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे.






