यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल झाला. पण मराठवाड्याला या पावसाचा तितकासा फायदा झाल्याचे चित्र दिसत नाही. खरंतर मराठवाड्यात मागील जवळपास आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस नसल्याने उकाडा वाढला असून उन्हामुळे पिकं कोमेजली आहेत. त्याशिवाय किडी व अळ्यांचा प्रादुर्भाव देखील पाहायला मिळतोय. हवामान खात्याने पुढील जवळपास दहा दिवसाची पावसाची अशीच परिस्थिती राहण्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पावसाची कमतरता; खरीप हंगाम धोक्यात
पावसाची गरज असून पिकांची वाढ खुंटलेली आहे.वाढत्या उन्हामुळे पिके कोमेजली आहेत. मातीतील ओल कमी झाल्याचा परिणाम पिकांच्या गुणवत्तेवर होतो. पिके चांगल्या अवस्थेत असली तरी कीडी आणि अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आहे. मोठा पाऊस झाल्यास खरीप हंगाम चांगला येऊ शकतो असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. पिके वाढण्याच्या अवस्थेत असताना मराठवाड्यात पावसाने पुन्हा दडी मारली आहे. उकाडा वाढलेला असून त्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. कणसे, शेंगा भरण्याची स्थिती असताना पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मराठवाड्यातील पिके धोक्यात; शेतकरी संकटात
रम्यान पिकांना सध्या पावसाची आवश्यकता आहे, ऐन हंगामामध्ये पावसाचा जोर ओसरल्यास याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो. मराठवाड्यात भीषण अवस्था आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अजूनही म्हणावा असा पाऊस झालेला नाही. आता त्यात भर म्हणजे जर दोन आठवडे पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पिकांना सध्या पावसाची आवश्यकता आहे, ऐन हंगामामध्ये पावसाचा जोर ओसरल्यास याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो. मराठवाड्यात भीषण अवस्था आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अजूनही म्हणावा असा पाऊस झालेला नाही. त्यामुळे मोठ्या आणि प्रभावी पावसाची प्रतीक्षा नेमकी संपणार कधी असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.
राज्यातील मान्सूनच्या जोर सध्या पूर्णपणे कमी झाला आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं शनिवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनची अवस्था सध्या कमजोर झाली आहे. पुढील दोन आठवडे तरी राज्यात अशीच स्थिती कायम राहणार आहे. या नव्या अंदाजामुळे शेतकरी वर्गाची चिंता मात्र चांगलीच वाढली आहे.
महाराष्ट्रात दोन आठवडे पाऊस ओढ देणार?
यावर्षी मान्सून देशासह राज्यात वेळेपूर्वीच दाखल झाला होता. सामान्यपणे मान्सून महाराष्ट्रात सात जून रोजी दाखल होतो. मात्र, मान्सून 25 मे रोजीच राज्यात दाखल झाला होता. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अल्प पाऊस झाला आहे. चांगला पाऊस झाला नसल्यामुळे बळीराजा आधीच संकटात सापडला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून ट्रफ आपल्या सामान्य स्थानापेक्षा अधिक उत्तरेकडे सरकरल्यानं मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे काही अभ्यासकांच्या मते राज्यात पुढील दोन आठवडे फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मोठ्या आणि प्रभावी पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.






