Farmer Suicides In Maharashtra : विदर्भ – मराठवाड्यात 1183 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कोणत्या जिल्ह्यात किती जाणून घ्या

Published:
शेतकरी आत्महत्या मागची कारणं ही वेगवेगळी आहेत... विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावर भलं मोठं कर्ज आहे.
Farmer Suicides In Maharashtra : विदर्भ – मराठवाड्यात 1183 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; कोणत्या जिल्ह्यात किती जाणून घ्या

शेतकरी आत्महत्येबाबत अत्यंत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मागील 8 महिन्यात मराठवाडा आणि विदर्भातील तब्बल 1183 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे (Farmer Suicides In Maharashtra). खरंतर शेतकऱ्याला उभ्या जगाचा पोशिंदा म्हटले जाते. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यावरच संपूर्ण जगातील लोक जगतात. मात्र आज याच शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची आणि जग सोडून जाण्याची वेळ आली आहे. एकीकडे सरकार मोठमोठ्या बाता करत असतं, शेतकऱ्यांचा कळवला दाखवत असते… मात्र तरीही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारला यश का नाही आलं हा प्रश्न अजूनही कायम आहे.,…. खास करून मराठवाडा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम पीच असलेल्या विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे.

काय सांगते आकडेवारी? Farmer Suicides In Maharashtra

यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांत विदर्भ आणि मराठवाड्यातील 1183 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवलं. यातील ६०७ शेतकरी आत्महत्या पात्र ठरविण्यात आल्या. तर ३०६ शेतकरी आत्महत्या अपात्र करण्यात आल्या. मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. यामध्ये मराठवाड्यातील आठ तर विदर्भातील सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार पश्चिम विदर्भात ७०७ शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ५२० आत्महत्याची नोंद आहे. धक्कादायक बाब म्हणजे ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक ४४ शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहे. Farmer Suicides In Maharashtra

अमरावती विभागात किती शेतकरी आत्महत्या??

अमरावती 143
अकोला 124
यवतमाळ 234
बुलढाणा 122
वाशिम 83
वर्धा 144

छत्रपती संभाजीनगर विभागात किती शेतकरी आत्महत्या?

छत्रपती संभाजीनगर 128
जालना 42
परभणी 71
हिंगोली 44
नांदेड 104
बीड 172
लातूर 42
धाराशिव 84

शेतकरी आत्महत्या करतोय??

शेतकरी आत्महत्या मागची कारणं ही वेगवेगळी आहेत… विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावर भलं मोठं कर्ज आहे…  पिकाला हवा तसा हमीभाव मिळत नाही त्यामुळे हे कर्ज फेडताना शेतकऱ्याच्या नाकीनऊ येतेय… आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मागच्या काही महिन्यात मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे उभे पीक पाण्याखाली गेलं…. ज्या पिकाला मोठे केले, तेच पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचललं आहे.

विरोधकांची सरकारवर टीका

शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी समोर आल्यानंतर राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.  शेतकरी आत्महत्यांचे सरकारला काही देणंघेणं नाही. महायुतीतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात. समाजात फूट पाडतात आणि शेतकरी मात्र मरत राहतो. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. शेतकरी मेला, कुटुंब उद्धवस्त झाले तरी यांना लाज नाही. कृषी खात्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न करता कर्मचाऱ्यांना टॅब द्यायचे का लॅपटॉप यावरून वाद सुरू आहेत असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews