मुंबईतील नरिमन पॉईट परिसरात आग, आगीचे कारण काय?, आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

Written by:Astha Sutar
Published:
मुंबईतील नरिमन पॉईट परिसरात आग, आगीचे कारण काय?, आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

Nariman Point Fire – मुंबईतील आगीच्या घटना कमी होण्याचं काही नाव घेत नाहीत. प्रत्येत आठवडा, पंधरा दिवसाला मुंबईत सातत्याने आगीच्या घटना होत आहेत. नुकतेच मुंबईतील मस्जिद बंदर आणि दक्षिण मुंबईत आग लागल्याची घटना ताजी असताना, आता मुंबईतील हाय प्रोफाईल कॉर्पोरेट  विभाग म्हणून ज्याकडे पाहिले जाते, त्या नरिमन पॉईट परिसरात आग लागल्याची घटना समोर आली आहे.

आगीचे कारण काय?

दरम्यान, नरिमन पॉईट परिसरातील नरिमन भवन या इमारतीला आग लागली होती. या परिसरात मोठी कॉर्पेरिटस कार्यालयं आहेत. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामन दलाचे जवान दाखल झाले.  नरिमन भवन या इमारतीचा ट्रान्सफार्मरचे शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे माहिती अग्निशमन दलाच्या विभागाने दिली आहे. तसेच ही आग आज सकाळी आठ सव्वा आठच्या दरम्यान लागली होती, आगीचा माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आला, अशीही माहिती अग्निशमन दलाच्या विभागाने दिली आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश…

सकाळी आठ सव्वा आट वाजता ही आग लागली होती. यावेळी आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली  असता, तत्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. आणि आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे आगीत कोणतेही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नाही. मात्र नरिमन भवन या इमारतीचा ट्रांसफार्मरच्या शॉर्टसर्किटला आग लागल्याने या आगीत ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला आहे.  

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews