Marathi News

Ganesh Chaturthi 2025: कधी आहे गणेश चतुर्थी? जाणून घ्या गणपती स्थापनेचा विधी, शुभ मुहूर्त आणि विसर्जनाची तारीख

Written by:Smita Gangurde
Published:
यंदा कधी आहे गणेश चतुर्थी... कधी आणि कशी कराल गणेशाची पूजा. कधी आहे गणेशाचं विसर्जन. सविस्तर जाणून घेऊया...
Ganesh Chaturthi 2025: कधी आहे गणेश चतुर्थी? जाणून घ्या गणपती स्थापनेचा विधी, शुभ मुहूर्त आणि विसर्जनाची तारीख

सनातन परंपरेनुसार, कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपती बाप्पाला वंदन करून केली जाते. हिंदू मान्यतेनुसार, विघ्न दूर करणारा श्री गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या चतुर्थीच्या मध्यान्हामध्ये झाला होता. याच कारणास्तव गणेशाचे भक्त या पवित्र तिथीची वाट पाहत असतात. यंदा कधी आहे गणेश चतुर्थी… कधी आणि कशी कराल गणेशाची पूजा. कधी आहे गणेशाचं विसर्जन. सविस्तर जाणून घेऊया…

गणेशाच्या पूजेशी संबंधित परंपरा

गणेशोत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या दिवशी होते. यानंतर अनंत चतुर्दशीला गणेशाचा विसर्जन होतं. गणपती बाप्पाची कृपादृष्टी आपल्यावर कायम असावी यासाठी दरवर्षी गणेश भक्त बाप्पाला घरी आणतात. त्याची विधीनुसार पूजा केली जाते. यानंतर दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला नदी, पवित्र सरोवर, समुद्रात जाऊन विधीनुसार विसर्जन केलं जातं.

गणेश चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त l Ganesh Pooja Muhurta

गणेश चतुर्थीला बाप्पाची मूर्ती घरात बसवण्यासाठी दुपारच वेळ निवडा. हिंदू मान्यतेनुसार, बाप्पाचा जन्म याच दिवशी झाला होता. पंचागानुसार, यंदाच्या वर्षी भगवान गणेशाचा मध्यान्ह पूजेचा शुभ मुहूर्त २७ ऑगस्ट २०२५ बुधवारी असेल. या दिवशी गणेश भक्त सकाळी ११.०५ वाजेपासून दुपारी १.४० मिनिटापर्यंत गणेशाची पूजा करू शकता. गणेशाची पूजा करण्यासाठी तब्बल अडीच तास मिळतील.

गणपतीची पूजा कशी कराल

हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश भक्तांनी सकाळी ध्यान केल्यानंतर सर्वात आधी गणेश चतुर्थी व्रताची विधीवत तयारी करावी. यानंतर घरातील ईशान्य कोपऱ्यावर एका चौरंगावर पिवळा कपडा पसरवा. गणपतीची मूर्ती त्यावर स्थापन करा. यानंतर गणेशाच्या मूर्तीवर गंगाजल शिंपडा. यानंतर हळदी-कुंकू वाहून पूजा करावी.

गणेश चतुर्थीच्या पूजेत गणपतीला प्रिय असणाऱ्या वस्तू ठेवाव्यात. यामध्ये दूर्वा, मोदक, नारळ, ऊस, जास्वदांचं फूल अर्पण करावे आणि यानंतर अथर्वशीर्षाचा पाठ करा. गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी विधीनुसार गणपतीची पूजा करावी आणि कोणा ब्राम्हण वा पुजाऱ्याला भोजन-प्रसाद दिल्यानंतर स्वत: ग्रहण करावं.

गणपती विसर्जन कधी l Ganesh Visarjan

हिंदू मान्यतेनुसार, १० दिवसांपर्यंत भगवान श्रीगणेशाची विधीनुसार पूजा करावी. विसर्जनाचा दिवस येताच त्यांची कृपा मिळण्यासाठी महत्त्वाचा दिवस असतो. याच कारणास्तव या दिवशी गणेश भक्त वाजत-गाजत शुभ मुहूर्तात बाप्पाचं विसर्जन करतात. पंचांगानुसार, या वर्षी गणपतीचं विसर्जन ६ सप्टेंबर २०२५ ला होईल.

Follow Us :GoogleNews