Marathi News

वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! १ जुलैपासून महावितरणची वीज १० टक्क्यांनी स्वस्त होणार

Written by:Astha Sutar
Published:
आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. असं मुख्यमंत्र्यांनी टिव्टमध्ये म्हटलं आहे.
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! १ जुलैपासून महावितरणची वीज १० टक्क्यांनी स्वस्त होणार

Mahavitaran electricity – घरगुती वीज ग्राहकांसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रत्येक महिन्याला १०० युनिट्सपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या वीजदरात १ जुलैपासून १० टक्क्यांनी स्वस्त  होणार आहे. तसेच येत्या पाच वर्षांत 26 टक्क्यांनी स्वस्त होणार आहे. सर्व संवर्गातील ग्राहकांच्या वीजदरात पुढील पाच वर्षे दरकपात करण्याचा आदेश राज्य वीज नियामक आयोगाने दिला आहे. त्यामुळं आता १० टक्क्यांनी वीज स्वस्त  होणार आहे.

राज्याच्या इतिहासात प्रथमच वीज स्वस्त…

दरम्यान, वीज कपातीच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिव्ट करत माहिती दिली आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली.

वीजखरेदी खर्चात बचत…

त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे. असं मुख्यमंत्र्यांनी टिव्टमध्ये म्हटलं आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews