महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत. त्यामध्ये आणखी एक गोड बातमी समोर येत आहे. ते म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या मिळणाऱ्या पैशांची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच यासंदर्भात भाष्य केल्याने या बाबीला अधिक महत्व आले आहे. एकीकडे योजना बंद होईल, असा अंदाज अनेकजण वर्तवत असताना मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार!
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी, या उद्देशानं सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीज हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र आता सरकार या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसू शकतो.
सरकारने निश्चित केलेल्या निकषांचं उल्लंघन करून अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं आता समोर आलं आहे, चक्क सरकारी नोकरीला असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. यावर आता मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारी नोकरीला असूनही लाभ घेणाऱ्या महिलांवर आगामी काळात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.






