गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. तर काहीजणं कोकणात जाण्यासाठी धावपळ करीत आहेत. दरम्यान सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
५ दिवस आधीच होणार पगार
राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, निवृत्तीधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांनी गणेशोत्सवात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही. कारण यंदा तब्बल ५ दिवस आधीच पगार होणार आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे.
सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्याचा पगार हा १ सप्टेंबरला होतो. मात्र यंदा गणेशोत्सव महिनाअखेरीस २७ ऑगस्टला आला आहे. यामुळे नागरिकांच्या पैशांची चणचण भासू शकते. त्यांना मनमुरादपणे गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी शासनाने सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना पाच दिवस आधी म्हणजे २६ ऑगस्टला, गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय कोणाला लागू असेल
सरकारी अधिकारी, कर्मचारी
निवृत्तीवेतनधारक
जिल्हा परिषद
मान्यता प्राप्त आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था
अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे
अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी/कर्मचारी
निवृत्तीवेतवधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक





