Marathi News

मंगळवारी रात्री मुंबईसह उपनगरात सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी, दहिसरमध्ये कोसळले झाड

Written by:Astha Sutar
Last Updated:
मुंबईत मंगळवारी रात्री जोरदार वारे आणि हलकासा पावसाने हजेरी लावली. सुसाट्याच्या आणि वादळी वाऱ्यासह पहिल्या पावसाने हजेरी लावली. रात्री नऊ-दहा वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात सुसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट यासह पावसाने हजेरी लावली.
मंगळवारी रात्री मुंबईसह उपनगरात सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी, दहिसरमध्ये कोसळले झाड

Mumbai Rain : दरवर्षी मान्सून 7 जूननंतर महाराष्ट्रात दाखल होतो. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात तापमानाचा पारा वाढला आहे. अंगाची लाही लाही होत असताना, कधी एकदा पाऊस पडतोय… थंडावा मिळतोय… गारवा मिळतोय अशी अवस्था मुंबईकरांची झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दोनच दिवसापूर्वी अंदाज वर्तवला होता की, या आठवड्यात सुसाट्याच्या आणि वादळी वाऱ्याचा पावसाची शक्यता असल्याचे म्हटलं होतं.

याचा प्रत्यय मंगळवारी रात्री मुंबईकरांना आल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी रात्री मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात रात्री नऊ-दहा वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात सुसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट यासह पावसाने हजेरी लावली.

सुसाट्याच्या वादळी वारा आणि पाऊस…

दरम्यान, मुंबईत मंगळवारी रात्री जोरदार वारे आणि हलकासा पावसाने हजेरी लावली. सुसाट्याच्या आणि वादळी वाऱ्यासह पहिल्या पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यांवर धूळ उडली. त्यामुळे चालणाऱ्यांना आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर धूळ आणि पावसाच्या थेंबांमुळे वातावरणात बदल झाल्याचे पाहयला मिळाले. जोगेश्वरी, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे नागरिकांना वाहतूक आणि दैनंदिन कामांमध्ये अडचणी निर्माण झाल्या. प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही तास असेच हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

वातावरणात थंडावा…

दुसरीकडे मुंबईच्या पहिल्या पावसात जोरदार वाऱ्यामुळे दहिसर पूर्व येथील दलवी कंपाउंड, बलिराम इंडस्ट्रीसमोर एस. व्ही. रोडवर एक झाड कोसळले. या घटनेमुळे रस्त्यावर मोठा वाहतूक कोंडीत झाली. पाऊस आणि झाड कोसळल्याने स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. तर मुंबईतही वादळी वाऱ्यामुळं झाड उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे गरमी आणि उकाड्यामुळं हैराण झालेल्या मुंबईकरांना रात्रीच्या पावसापासून थंडावा आणि वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews