Marathi News

राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीची शक्यता, मुंबईत रेड अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज काय?

Written by:Astha Sutar
Last Updated:
आज मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण आणि ठाणे येथे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीची शक्यता, मुंबईत रेड अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज काय?

Maharashtra Weather : पावसाबाबत एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. विदर्भ वगळता राज्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अनेक भागात पावसामुळे अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उंच लाटांचा इशारा…

दरम्यान, आज मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण आणि ठाणे येथे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं समुद्र किनारी न जाण्याचा आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अतिवृष्टीची इशारा…

दुसरीकडे राज्याती काही भागात पावसामुळे अतिवृष्टीची होण्याची शक्यता आहे. तसेच सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा दोन दिवसांपर्यंत देण्यात आला असून, या कालावधीत समुद्रात 3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे. या दरम्यान समुद्रामध्ये लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः  थांबवण्याचाही इशारा  देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews