महाराष्ट्राच्या काही भागांत आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज काय?

Written by:Rohit Shinde
Published:
आगामी काही दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर चांगला राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज जाणून घेऊ...
महाराष्ट्राच्या काही भागांत आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. 21 ते 26 जुलै हा चांगलाच पावसाचा काळ असेल असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात या काळात पावसाची स्थिती उत्तम राहील, असा अंदाज आहे. कोकणात पावसाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले आहे. मुंबई, ठाणे आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान खात्याने यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. मध्य महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यातही या भागात चांगला पाऊस पडेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार!

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात 21 ते 26 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेत 21 जुलै रोजी सौराष्ट्र, कच्छ राज्यातील  मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्याता आला आहे. 23 ते 25 जुलै रोजी विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर, 23 ते 26 जुलै रोजी मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहारमध्ये 24 ते 26 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतीपिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून देशातील काही भागात पावसाने उघडीप घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.

मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांत कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आज, 21 जुलै रोजी, या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक जाणवण्याची शक्यता आहे. तरीही काही ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे वातावरण अधिक उष्ण आणि दमट बनले आहे. अनेक भागांत हलक्या रिमझिम सरी पडत असल्या तरी, उन्हाची तीव्रता आणि उकाड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कोकण किनारपट्टीवर मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. आकाश ढगांनी व्यापलेले असून, पुन्हा एकदा जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. किनारी भागात दमट हवामान जाणवत असून, कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यानंतर आता पुन्हा पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews