Marathi News

कोकण आणि विदर्भात आज अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकण आणि विदर्भात आज अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाला पोषक हवामान तयार झाले असून, त्याचा प्रभाव राज्याच्या इतर भागांवरही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढेल आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नेमका हवामान विभागाचा अंदाज काय ते सविस्तर समजून घेऊ…

कोकण-विदर्भात पावसाचा अंदाज

राज्यात अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या 11 तासांपासून विदर्भातील 11 जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. पुढील 24 तासांतही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून, येत्या 24 तासांत या भागातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील इतर भागातही पाऊस?

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews