मुसळधार पावसाने मुंबईची केली तुंबई, रस्ता खचल्यामुळं बेस्ट बसेसचे मार्ग दुसरीकडे वळविले

Written by:Astha Sutar
Published:
रस्ता खचल्यामुळे अप दिशेतील बस मार्ग क्रमांक 104, 121, 122 ,132,135 ह्या बसेस पेडर रोड, कॅडबरी जंक्शन, भुलाबाई देसाई मार्गाने 10.30 वाजल्यापासून जे. एम. मेहता मार्गाकडे वळविण्यात आल्या. पावसाचा फटका रेल्वेसह बेस्टलाही बसला.
मुसळधार पावसाने मुंबईची केली तुंबई, रस्ता खचल्यामुळं बेस्ट बसेसचे मार्ग दुसरीकडे वळविले

Mumbai Rain – राज्यातील विविध भागात रविवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका मुंबईतील चाकरमानी यांना बसलाय. तर दुसरीकडे सकाळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. या पावसाचा फटका मुंबईतील बेस्ट वाहतुकीलाही बसला आहे. जोरदार पाऊस आणि पाणी यामुळे मुंबईतील काही ठिकाणी रस्ता खचल्याचे चित्र आहे. त्यामुळं बेस्ट बसेसचे मार्ग अन्य ठिकाणी वळविण्यात आला आहे.

रस्ता कुठे खचला?

दरम्यान, मुंबईत कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, माटुंगा, भायखळा, दादर, सायन, मस्जिद बंदर, ठाणे या ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तुंबलेला पाण्यातूनच प्रवाशांना वाट काढावी लागली. या पाण्यामुळे केम्स कॉर्नर ते मुकेश चौकच्या दरम्यान रस्ता खचल्यामुळे अप दिशेतील बस मार्ग क्रमांक 104, 121, 122 ,132,135 ह्या बसेस पेडर रोड, कॅडबरी जंक्शन, भुलाबाई देसाई मार्गाने 10.30 वाजल्यापासून जे. एम. मेहता मार्गाकडे वळविण्यात आल्या. पावसाचा फटका रेल्वेसह बेस्टलाही बसला.

मुंबईत सकाळी ११ वाजेपर्यंत पाऊस किती?

  • कुलाबा उदंचन केंद्र २०७ मिमी
  • नेत्र रूग्णालय, दोन टाकी २०२
  • सी विभाग कार्यालय (चंदनवाडी, मरीन लाईन्स) १८०
  • मेमनवाडा अग्निशमन केंद्र १८३
  • नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र २५२ मिमी
  • ए विभाग कार्यालय २१६ मिमी
  • महानगरपालिका मुख्यालय २१४ मिमी
  • सुपारी टँक, वांद्रे १०१
  • जिल्हाधिकारी वसाहत, चेंबूर ८२
  • एल विभाग कार्यालय, कुर्ला ७६
  • ब्रिटानिया उदंचन केंद्र, वरळी १७१
  • नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ १०३
Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews