Marathi News

आज विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Written by:Astha Sutar
Last Updated:
रविवारी 22 जून रोजी राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तसेच काही भागात वादळी वारा आणि विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. 
आज विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Maharashtra Weather : पावसाबाबत एक मोठी व महत्वाची बातमी समोर येत आहे. सध्या विदर्भ वगळता राज्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढील चार दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज रविवारी (२२ जून) राज्यातील अनेक भागात वादळी वारा आणि विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. तसेच काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यलो अलर्ट कुठे?

दरम्यान, रविवारी 22 जून रोजी राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट हवामान विभागाने  जारी केला आहे. पण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप कायम राहील, अशी शक्यता आहे. दरम्यान, कोकणातील ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातील ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ऑरेंज अलर्ट कुठे?

दुसरीकडे मराठवाड्यातील जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवमध्ये हलक्या सरीची तसचे मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या घाट परिसर. सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. विदर्भात भंडारा, गोंदिया, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews