Marathi News

राज्यात हिंदीची सक्ती नाही, सर्व शाळांत मराठी प्रभावीपणे राबवणार, शिक्षणमंत्री दाद भुसे यांची ग्वाही

Written by:Astha Sutar
Published:
तिसरी भाषा सक्ती सरकारने केली नाही. तिसरी भाषा ही इयत्ता पहिली आणि दुसरी पर्यंत आहे यात केवळ मौखिक शिक्षण असणार आहे. यात कोणतेही पुस्तक नसणार आहे. मात्र तिसरीनंतर तिसऱ्या भाषेचं पुस्तक आहे.
राज्यात हिंदीची सक्ती नाही, सर्व शाळांत मराठी प्रभावीपणे राबवणार, शिक्षणमंत्री दाद भुसे यांची ग्वाही

Dada Bhuse – राज्यात सध्या हिंदी भाषा सक्तीवरुन वाद सुरु आहे. आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. पण राज ठाकरेंना सरकारचे धोरण आण सरकारची भूमिका न पटल्यामुळं ५ जुलै रोजी मनसे सर्वपक्षीय भव्य मोर्चा काढणार आहेत. तर दुसरीकडे राज्यात  दरम्यान, राज्यात हिंदी भाषेची सक्ती नाही, सर्व शाळांत मराठी भाषणा प्रभावीपणे राबवणार असल्याची ग्वाही शिक्षणमंत्री दाद भुसे यांनी दिली आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

तिसरी भाषा कोणतीही निवडू शकता….

दुसरीकडे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० रोजी आले आहे, तिसरी भाषा म्हणून २० ते २५ भाषांचे पर्याय आहेत. त्यातून कोणतीही भाषा विद्यार्थी आणि पालक निवडू शकतात. त्यात सर्व अभ्यास करून हे धोरण आले आहे, यातील काही गोष्टी ह्या राज्यावर सोपवल्या आहेत. तिसरीनंतर तिसरी भाषेचं पुस्तक आहे. सध्या राज्यात मराठी माध्यम शाळा ८५ हजार पेक्षा अधिक आहेत. तर १५ हजार पेक्षा अधिक इंग्लिश शाळा आहेत. मुंबईत २ हजारपेक्षा अधिक इंग्लिश शाळा आहेत. तर ९०० च्यावर मुंबईत मराठी माध्यमाचा शाळा आहेत. दरम्यान, सध्या तज्ज्ञांची मते घेऊन यावर तिसऱ्या भाषेचा निर्णय घेणार असल्याचे मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

सर्व शाळांत मराठी बंधनकारक…

दरम्यान, पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले की, आपण याआधी इंगजी दुसरी भाषा म्हणून स्वीकारली आहे. शाळांत मराठी शिकवण्याचे प्रभावी आमलबजावी झाली पाहिजे, असं दादा भुसे म्हणाले. तिसरी भाषा ही कोणतीही असू शकते. पण सरकारने हिंदी भाषा ही सक्तीची केलेली नाही. राज्यात सर्व मराठी शाळांत मराठी शिकवण्याचे बंधनकारक केले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळाला आहे. यानंतर ही भाषा देशपातळीवर पोहचण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. सर्व भाषांचा आदर राखला पाहिजे. २०२० साली त्रिभाषेबद्दल शैक्षणिक धोरण आले होते. असं भुसे यावेळी म्हणाले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews