गणपतीसाठी गावी जाण्यासाठी लालपरीला मोठा प्रतिसाद, आतापर्यंत कोकणात ५१०३ जादा बसेस फुल्ल, मंत्री सरनाईकांची माहिती

Written by:Astha Sutar
Published:
मुंबईतील कोणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ०७ सप्टेंबर दरम्यान ५२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 
गणपतीसाठी गावी जाण्यासाठी लालपरीला मोठा प्रतिसाद, आतापर्यंत कोकणात ५१०३ जादा बसेस फुल्ल, मंत्री सरनाईकांची माहिती

Pratap Sarnaik – परिवहन खात्यातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गणपती सणांसाठी कोकणवासीय मोठ्या प्रमाणात कोकणात जातात. दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून, गणपती सणांसाठी पुणे, मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासीयांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या एकूण ५१०३ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

कोकणवासीयांची एसटीला पसंती…

दरम्यान, कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत. तसेच “सर्व गणेशभक्त प्रवाशांचा प्रवास सुखकर होवो!” अशा शुभेच्छा प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी दिल्या आहेत. तसेच २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकर कोकणवासीयांच्या सेवेसाठी एसटी धावत असते, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

कोकणवासीय व एसटीचे अतुट नाते

व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणपती बाप्पा, आणि मुंबईचे कोकणवासीय व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. मुंबईतुन कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्ती पर्यंत फक्त एसटीच कोकणवासीयांना सुखरूप पोहोचवते.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews