Pratap Sarnaik – लालपरी अर्थात राज्यातील एसटीबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) पद्धतीने अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात यावा. राज्य परिवहन महामंडळाच्या शहरांमध्ये बसस्थानक, बस आगार परीसरात जागा आहेत. अशा जागांचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करू शकते. यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यात यावे, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिल्या.
जागांचे वर्गीकरण करून पॅकेज करावे…
दरम्यान, पुढे बोलताना सरनाईक म्हणाले की, परिवहन महामंडळातील एसटीच्या राज्यातील जागांचा विकास करताना स्थानिक परिस्थिती, व्यावसायिक लाभ आदी बाबी लक्षात घेण्याचे सांगत परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, या जागांच्या विकासासाठी अ, ब आणि क असे वर्गीकरण करून त्यांचे एक पॅकेज करावे. ज्यामध्ये शहरी, निमशहरी आणि ग्रामीण जागांचा समावेश असावा. असे मंत्री सरनाईक म्हणाले. दरम्यान, एस.टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहात महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.
पॅकेजेसमधून आगाराचा होणार विकास…
दुसरीकडे पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) पद्धतीने अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात आल्यानंतर पॅकेजमधील मालमत्तेचे मूल्य त्याच पॅकेजमध्ये असावे. राज्यात 72 पॅकेजेसमधून एसटी बसस्थानक, आगार आदींचा विकास करण्यात येणार आहे. पॅकेजमध्ये कामाबाबत सुधारणा करायची असल्यास सुधारणा करून घ्याव्यात. तसेच या कामाला गती देवून तातडीने कार्यवाही पूर्ण करावी. जेणेकरुन एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.





