भारतीय रेल्वेला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते कारण ती स्वस्त, सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाचे माध्यम आहे. रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात सहज पोहोचता येते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे सर्वात किफायतशीर पर्याय मानली जाते. प्रवाशांना स्लीपर, एसी, जनरल अशा विविध श्रेणींमध्ये प्रवासाची सुविधा मिळते. ऑनलाइन तिकीट बुकिंग, खाद्यसेवा, स्वच्छता आणि वेळेवर धावणाऱ्या गाड्या यामुळे रेल्वेवरील विश्वास वाढला आहे. ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणाऱ्या या सेवेमुळे भारतीय रेल्वे ही केवळ वाहतुकीचे साधन नसून देशाच्या प्रगतीचे प्रतीक बनली आहे. मात्र आता रेल्वेच्या बुकींग संबंधिच्या नियमांमध्ये काही महत्वपूर्ण बदल होणार आहेत. 11 नोव्हेंबरपासून नवे बदल लागू होतील.
नेमके कोणते बदल होणार ?
11 नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वेमध्ये तिकीट बुकिंग नियम बदलत आहेत. नेमके कोणते बदल करण्यात येणार आहेत ते सविस्तर जाणून घेऊयात. नव्या नियमांचा उद्देश तिकीट बुकिंगची प्रक्रिया प्रवाशांसाठी अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवणे हा आहे.
ट्रेन तिकिटांच्या केलेल्या बदलांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकीटांची बुकिंग अगोदर ६० दिवसांपर्यंत करता येईल तसेच आरक्षित तिकीट बुक केल्या नंतर पहिले 15 मिनिटांत आधार पडताळणी करणे अनिवार्य आहे. रेल्वेने केवळ तिकीट बुकिंगच्या वेळेतच नव्हे, तर स्लीपर आणि एसी कोचच्या बुकिंगच्या वेळेतही बदल केला आहे. याशिवाय, तिकीट रद्द करण्याचे नियम, सामान घेण्याची मर्यादा आणि वेटिंग लिस्टशी संबंधित अटींमध्येही सुधारणा केल्या आल्या आहेत.
- आता तिकीट फक्त प्रवासाच्या तारखेपासून 60 दिवसांपूर्वी बुक करता येईल. यापूर्वी ही मुदत 120 दिवस होती.
- ऑनलाइन आरक्षणाच्या पहिल्या 15 मिनिटांत तिकीट बुक करण्यासाठी आधार लिंक खाते आणि आधार तपासणी करणे अनिवार्य आहे.
- तिकीट बुकिंग सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि रात्री 8 वाजेपर्यंत चालू राहील.
-
तत्काळ तिकीट बुकिंगस्लीपर क्लाससाठी सकाळी 11 वाजता आणि एसी क्लाससाठी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
-
आरक्षित कोचमध्ये सोपे आणि बसण्याचे वेगळे वेळापत्रक लागू केले आहे;
-
रात्री 10 वाजता ते सकाळी 6 वाजेपर्यंत प्रवाशांनी आपली बर्थ वापरणे अनिवार्य आहे.
-
वरिष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील महिला आणि गर्भवती महिला यांना लोअर बर्थची प्राधान्य देण्यात येईल.
नव्या बदलांचा प्रवाशांना फायदा ?
भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हितासाठी सातत्याने वेगवेगळे निर्णय घेतले जातात. अशा परिस्थितीत आता हे नवे नियम लागू केले गेले आहेत. नव्या नियमांचा उद्देश तिकीट बुकिंगची प्रक्रिया प्रवाशांसाठी अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवणे हा आहे. आगाऊ बुकिंग कालावधी कमी केल्याने प्रवाशांना लवकर टिकीट मिळतील आणि ब्लॉक होण्याची समस्या कमी होईल. आरक्षित तिकीटांसाठी आधार तपासणी अनिवार्य असून फक्त आधार लिंक असलेल्या खात्यांना प्राधान्य मिळेल.






