आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशभरात उत्साह; दिग्गजांनी केली योग साधना

Written by:Rohit Shinde
Published:
आज 21 जून योग दिन देशभरात मोठ्या उत्साहात पार पडला. अनेक राजकीय नेते, अभिनेत आणि सर्वसामान्य नागरिकांनी आज योग साधना केली.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशभरात उत्साह; दिग्गजांनी केली योग साधना

आज, 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असून भारतातही सर्वत्र उत्साह दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. जागतिक योगदिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पुढाकाराने पुण्यात ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ होणार आहे.यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी,विद्यार्थी अन पुणेकर योगासने करणार आहेत. हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली.

अनेक ठिकाणी सामूहीक योगासने

जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने अमरावती शहर पोलीस दलातील कर्मचारी प्रवीण आखरे यांनी जलतरण केंद्रात पाण्यामध्ये योगासनं केली. त्यांनी 11 फूट खोल पाण्याच्या आत तब्बल 1 तास 2 मिनिटे कोणतीही हालचाल न करता सावधान स्थितीत राहून अनोखा विक्रम केला. तर मालेगावातही कॉलेज मैदानावर योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. शालेय शिक्षण मंत्री मंत्री भुसे, मालेगावकर नागरिक, ओम शांती परिवार आणि अधिकारी यांनी योगासनं केली.

योग विद्या प्रचीन संस्कृती – फडणवीस

योग विद्या आपली प्राचीन संस्कृती. पुण्यात झालेला भक्तीयोगाचा कार्यक्रम अतिशय आनंद देणारा – आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना. भाजपाच्या आणि इतर पक्षांच्या वतीने देखील काही ठिकाणी सामूहीक योगासने करण्यात आली.

देशभरासह संपूर्ण जगात आज 111 वा अंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरातील पाथ्रीकर कॉलेज येथे महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींसोबत भाजप आमदार नारायण कुचे यांनी या योग दिवसात सहभाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारची योगासने करत हा दिवस आनंदात साजरा केला.

योगाचा आधार घेत राजकीय सल्ला

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे रेल्वे मैदानावर आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह रेल्वे विभागाचे डी आर एम तसेच जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांची देखील उपस्थिती होती. या दरम्यान गिरीश महाजन यांनी खडसेंचं नाव न घेता त्यांना सल्ला दिला.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews