Marathi News

परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपासाला वेग; 21 महिन्यानंतर आयपीएस पंकज कुमावतांच्या नेतृत्वात एसआयटीचा तपास

Written by:Rohit Shinde
Published:
बीड जिल्ह्याच्या परळी येथील व्यापारी मयत महादेव मुंडे हत्येचा तपास करण्यासाठी अखेर एस आय टी मार्फत आय पी एस पंकज कुमावत परळीत दाखल झाले.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपासाला वेग; 21 महिन्यानंतर आयपीएस पंकज कुमावतांच्या नेतृत्वात एसआयटीचा तपास

बीड जिल्ह्याच्या परळी येथील व्यापारी मयत महादेव मुंडे हत्येचा तपास करण्यासाठी अखेर एस आय टी मार्फत आय पी एस पंकज कुमावत परळीत दाखल झाले. मयत महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात बराच विलंब झाला. त्यानंतर आता या तपासाला गती मिळत आहे. पोलिस प्रशासनातील तब्बल 9 तपास अधिकारी या प्रकरणातुन दुसरीकडे पाठवण्याचे काम केले असल्याचे ही वारंवार सांगण्यात आले आहे. मात्र आरोपी ताब्यात घेण्यास पोलिस प्रशासन का विलंब करत असल्याचे आरोप ही करण्यात आले आहे. तर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अनेक वेळा विविध प्रकारचे आंदोलने केली पण हाती फक्त निराशाच आली.

एसआयटीच्या स्थापनेनंतर हत्येच्या तपासाला गती

निःपक्ष आणि पारदर्शक तपासणी होण्यासाठी मयत महादेव मुंडे यांच्या कुटुंबाने प्रकरण एस आय टी कडे देण्यात यावे असे म्हटले होते आणि तब्बल 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांची मागणी मान्य केली आणि एस आय टी मध्ये टीम लीडर म्हणून आय पी एस पंकज कुमावत याची नियुक्ती करण्यात आली. महादेव मुंडे यांच्या खुनाचा डाव रचला होता याचा तपास करण्यासाठी आज परळी येथील तहसील कार्यालय परिसरात पंकज कुमावत व त्यांच्या टीमने पाहणी केली. निमित्ताने मयत महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात दोषी म्हणून कोणाचे नाव समोर येणार हे पाहणे यानिमित्ताने महत्वाचे ठरणार आहे. या आधी गोट्या गित्ते, वाल्मिक कराड गँगवर या निमित्ताने आरोप झाले होते.

परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण नेमकं काय?

व्यवसाय करणारे महादेव मुंडे यांची 21–22 ऑक्टोबर 2023 रोजी परळी तहसील कार्यालयाच्या बाहेर धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजनुसार तपासाच्या दुसऱ्या दिवशी परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. तपास सुरुवातीला स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत सुरू झाला, पण आरोपी कोण आहेत व हत्येचे कारण काय याबाबत पुरावा न मिळाल्यामुळे तपासाची प्रगती थांबली. तब्बल 18 महिन्यांनीही आरोपींना अटक नाही; पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप या प्रकरणात केला जात आहे. त्यामुळे महादेव मुंडे प्रकरणाचे गुढ मोठे आहे. याबाबत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पत्नी या नात्याने आता पाठपुरावा सुरू केला आहे. अशात त्यांना आत्मदहन आणि विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने एसआयटी स्थापन झाली, आणि आयपीएस पंकज कुमावतांच्या नेतृत्वात एसआयटीकडून तपासाला गती मिळाली.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews