लाडकी बहिण योजनेच्या जूनच्या हप्त्यासाठी सरकारची जुळवाजूळव; कधी मिळणार जूनचे 1,500?

Written by:Rohit Shinde
Published:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.
लाडकी बहिण योजनेच्या जूनच्या हप्त्यासाठी सरकारची जुळवाजूळव; कधी मिळणार जूनचे 1,500?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना आता जून महिना हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय कडून 410 कोटी वर्ग करण्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना जून महिन्याचे अनुदान देण्यासाठी अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला 410 कोटी 30 लाख रुपये इतका निधी वळविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती. आता जून महिना हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय कडून 410 कोटी वर्ग करण्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.  त्यामुळे लाडकी बहिण योजनेचे जून महिन्याचे पैसे लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.

जून-जुलैचे पैसे एकत्रित मिळणार?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा एकत्रित हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही हप्तांचे मिळून 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. जुलै महिन्यात आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केला जाऊ शकतात. मात्र, या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. शिवाय, जूनचे पैसे नेमके कधी मिळणार? याबाबत देखील शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप समोर आलेली नाही.

 योजनेची वर्षपूर्ती, 11 हप्ते मिळाले!

महायुतीमधील घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी जारी करण्यात आला होता. त्यानंतर योजनेसंदर्भात आणखी एक शासन निर्णय काढण्यात आला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना 1500 रुपये दरमहा दिले जातात. मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews