Marathi News

महाराजांचे गड किल्ले व राज्यकारभार जागतिक ख्यातीचा होताच, पण त्यावर मोहर उमटण्याची गरज होती – मुख्यमंत्री

Written by:Astha Sutar
Published:
आज झालेला माझा सत्कार हा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते होतो आहे याचा मला नक्की आनंद आहे, पण त्यासोबतच हा सत्कार सर्वांचा प्रतिनिधिक म्हणून मी स्विकारतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.
महाराजांचे गड किल्ले व राज्यकारभार जागतिक ख्यातीचा होताच, पण त्यावर मोहर उमटण्याची गरज होती – मुख्यमंत्री

CM Devendra Fadnavis – युनोस्कोला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची रचना भावली. जंगल, डोंगर, समुद्र या नैसर्गिक साधनांचा करण्यात आलेला कौशल्यपुर्ण उपयोग आणि त्यातून निर्माण केलेला आहे. यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा प्रतिनिधी म्हणून सत्कार स्विकारतो, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्ले यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये झाल्याच्या निमित्ताने मुंबई भाजपातर्फे रवींद्र नाट्य मंदिर येथे “शिवकल्याण राजा” चा विशेष भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलते होते.

प्रतिनिधी म्हणून मी सत्कार स्वीकारतो…

दरम्यान, मंत्री आशिष शेलारांनी आपल्या भाषणात गड किल्यांना जागतिक वारसा मिळण्याची प्रक्रिया विषद करुन या संपूर्ण प्रक्रियेत मोठे योगदान असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जाहीर आभार ही मानले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची वैशिष्ट्ये, रचना, स्थापत्य, प्राचीनतेची माहिती देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युध्दनितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितली. तसेच  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आज हा सत्कार स्वीकारतो.

12 विविध प्रस्तावातून याला स्थान…

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि राज्यकारभार हा जागतिक ख्यातीचा होताच पण त्यावर एक मोहर उमटण्याची गरज होती ती या निमित्ताने पूर्ण झाली. अभेद्य गड व त्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला लोक कल्याणकारी राज्य कारभाराची माहिती युनोस्को मध्ये आपण जेव्हा मांडली तेव्हा युनोस्कोचे सदस्य आच्छर्य चकित झाले. देशातून आलेल्या 12 विविध प्रस्तावातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा प्रस्ताव निवडला. व तो जागतिक वारसा मानांकनासाठी युनोस्कोमध्ये पाठवला.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews