बारावीचा आज निकाल, निकाल पाहण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर

Written by:Rohit Shinde
Published:
बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पालकांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. आज दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. नेमका निकाल कसा पाहायचा?
बारावीचा आज निकाल, निकाल पाहण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. आज बारावीचा निकाल लागणार आहे. आज सकाळी बोर्डाकडून एक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता निकाल जाहीर होईल. या निकालाकडे आता बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. पण हा निकाल बघायचा कसा? नेमका कुठे बघायचा तेच सविस्तर जाणून घेऊ…

असा बघा निकाल

बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाइन तपासण्यासाठी हे करा:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावी परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करते. निकाल तपासण्यासाठी प्रथम mahresult.nic.in, hscresult.mkcl.org किंवा mahahscboard.in या संकेतस्थळावर जा. मुख्य पृष्ठावर “HSC Examination Result” किंवा “12th Result” असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आणि काही संकेतांक भरावा लागतो. सर्व माहिती भरल्यानंतर “Submit” बटणावर क्लिक करा. काही क्षणांतच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. निकालात तुम्हाला एकूण गुण, विषयानुसार गुण, ग्रेड आणि उत्तीर्ण/अनुत्तीर्ण स्थिती दिसेल. हा निकाल PDF स्वरूपात डाऊनलोड करून प्रिंटही काढता येतो. असे जाहीर झालेल्या ऑनलाईन निकालांची खातरजमा आपल्या कॉलेजमधून लवकरात लवकर करून घ्यावी.

लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार

एचएससी निकाल हा विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये महत्त्वाचा टप्पा असतो. या निकालावर पुढील शिक्षणाची दिशा ठरते, जसे की इंजिनीअरिंग, मेडिकल, कॉमर्स, आर्ट्स किंवा अन्य व्यावसायिक कोर्सेससाठी प्रवेश. उच्च गुण मिळाल्यास उत्तम महाविद्यालये व अभ्यासक्रमासाठी संधी मिळते. काही शिष्यवृत्तींसाठीही हा निकाल विचारात घेतला जातो. त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक याला खूप महत्त्व देतात. मात्र, हा निकाल अंतिम नाही; पुढे प्रयत्न, कौशल्य, आणि मेहनतीच्या आधारावर यश मिळवता येते. निकाल अपेक्षेप्रमाणे नसलात तरीही अनेक पर्याय उपलब्ध असतात. योग्य मार्गदर्शन व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश नक्कीच मिळते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews