एकीकडे सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र गायब झालेल्या वरुणराजाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळाली. आता तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज पासून म्हणजेच 21 ऑक्टोबर पासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशावेळी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
पावसाचे नेमकं कारण काय? Maharashtra Rain
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने राज्यभरात अवकाळी पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. मघाशी सहा वाजता मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. उद्यापासून 5 दिवस कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Rain
कोणकोणत्या जिल्ह्याला पावसाचा फटका बसणार?
21 ऑक्टोबर रोजी हिंगोली, वाशिम, नांदेड, परभणी, लातूर, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
22 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, धाराशिव, लातूर, यवतमाळ, नांदेड आणि बुलढाणा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Maharashtra Rain
23 ऑक्टोबर रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, बीड, सोलापूर, नांदेड, वाशिम, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
24 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ ,वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची हजेरी पाहायला मिळेल
25 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर ,संभाजीनगर, बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भात पावसाची बॅटिंग बघायला मिळेल.






