हाताबाहेर गेलेलं मराठा आंदोलन पूर्णपणे बेकायदेशीर, कायद्यानं योग्य ती कारवाई करा, हायकोर्टाचे निर्देश

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
आंतरवाली सराटीत आंदोलन करणारे हेच आंदोलनकर्ते होते. तिथेही तेच पत्रकार होते. परंतु पत्रकारांना त्रास झाला नाही. इथे पत्रकारांना त्रास होतोय. येथे मात्र वेगळे षडयंत्र दिसतेय, त्यामुळं मुंबईकरांना त्रास देऊ नका, असं मनोज जरांगे-पाटील म्हणालेत.
हाताबाहेर गेलेलं मराठा आंदोलन पूर्णपणे बेकायदेशीर, कायद्यानं योग्य ती कारवाई करा, हायकोर्टाचे निर्देश

Maratha Reservation – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे मुंबईत गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करतात. आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. दरम्यान, आज या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी पार पडला. मनोज जरांगे-पाटील यांना आंदोलनासाठी परवानगी दिली नाही, राज्य सरकारचा हायकोर्टात दावा केला आहे. यानंतर पुन्हा एकदा उद्या यावर सुनावणी पार पडणार आहे. पण आंदोलन हे उद्या संपवावे लागेल. असे याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.

कायद्यानं योग्य ती कारवाई करा…

दरम्यान, आजच्या सुनावणीत दोन्ही बाजूनी युक्तीवाद झाला, पण सुनावणीत कोर्टानं म्हटलंय की, एका दिवसाच्यावर कधीही परवानगी दिली नाही, राज्य सरकारचा हायकोर्टात दावा केला होता. यावर कोर्टानं म्हटलं की, हाताबाहेर गेलेलं मराठा आंदोलन पूर्णपणे बेकायदेशीर आहे, उद्या मंगळवारपर्यंत दक्षिण मुंबई रहदारीसाठी मोकळी करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यासाठी कायद्यानं योग्य ती कारवाई करा, असं हायकोर्टानं आंदोलनावर म्हटलं आहे. तसेच लोकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी सरकारने घ्यावी, असे निर्देश कोर्टानं दिले आहेत.

ही शेवटची आणि आरपारची लढाई…

दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मेलो तरी चालेल…, पण आरक्षण घेऊनच उठणार आहे. असा इशारा जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गर्दीचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. दक्षिण मुंबईतील परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. आंदोलनाचा त्रास मुंबईकरांना होत आहे. तसेच पार्किंग ठिकाणी गाड्या न लावता रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. त्या गाड्या आंदोलकांनी मैदानात लावावा. ज्यांना कुणाला हे ऐकायचं नसेल त्यांनी आपल्या गावी जावं, असं आवाहन कोर्टाच्या सुनावणीनंतर जरांगे-पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना केलं आहे.

गोळ्या घाला… पण आरक्षण घेणारच…

दुसरीकडे आपल्या लेकरांसाठी आपल्या समाजासाठी मी आरक्षण घेणारच आहे. असं जरांगे पाटील म्हणाले. परंतु आपल्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होता कामा नये, कोणीही त्रास देऊ नये, असं आवाहन जरांगे-पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना केलं आहे. तसेच मराठा आरक्षणाची ही आता शेवटची आणि आरपारची लढाई आहे. सरकारी येऊ द्या… पोलीस येऊ द्या… प्रशासन येऊ द्या… बंदूक घेऊन या… गोळ्या घालून दे… मी मेलो तरी चालेल. पण इथून आरक्षण घेऊनच उठणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews