महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा आणि सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. रविवार, 04 जानेवारी 2025 रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये दराची एकूण काय स्थिती राहिली, त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
कांद्याच्या दरात वाढ; शेतकऱ्यांना दिलासा
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये 51 हजार 656 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील पुणे मार्केटमध्ये 24 हजार 299 क्विंटल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला कमीतकमी 750 ते जास्तीत जास्त 1700 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. पुणे चिंचवड मार्केटमध्ये कांद्याला सर्वाधिक 2505 रुपये बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात किंचित वाढ झालेली दिसून येत आहे.
सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा मोठी घट
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 118 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनची आवक फक्त लातूर मार्केटमध्ये झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 4700 ते जास्तीत जास्त 4890 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. शनिवारी मिळालेल्या सर्वाधिक दरात आज पुन्हा घट झाली आहे.






