रविवारी म्हणजेच आज 6 जुलैला लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा… कारण, रविवारी (6 जुलै) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. तसेच काही लोकल रद्द सुद्धा करण्यात येणार आहेत. मुंबईकरांची आज चांगलीच दैना होण्याची शक्यता आहे.
लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन बनली आहे. दररोज लाखो नागरिक लोकल ट्रेनने प्रवास करतात. तुम्ही रविवारी लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा… कारण, रविवारी (6 जुलै) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. तसेच काही लोकल रद्द सुद्धा करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेकडून रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायर यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. जाणून घ्या कोणत्या मार्गावर कोणत्या वेळेत ब्लॉक असणार आहे आणि कोणत्या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड या रेल्वे स्थानकांच्या अप आणि डाऊन जल मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी माहाराज टर्मिनस आणि ठाणे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. तसेच माटुंगा आणि मुलुंड स्थानकांच्या दरम्यान गाड्या 15 मिनिटे उशइराने पोहोचतील.
हार्बर मार्गावरील पनवेल आणि वाशी या मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर 11.05 ते संध्याकाळी 4.05 वाजेपर्यंत पोर्ट लाईन वगळून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी पनवेल आणि सीएसएमटी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 9.45 ते संध्याकाळी 5.12 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद राहणार आहे.पनवेल आणि ठाणे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा सुद्धा सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत रद्द राहणार आहे. या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या विरार आणि डहाणू भागात पालघर आणि बोईसर दरम्यान रेल्वे पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 8.30 ते 10.30 दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच शनिवारी रात्री सुद्धा रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आज घरातून बाहेर पडण्याचे नियोजन असेल तर योग्य तयारीने आणि लोकल गाड्यांचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.






