Marathi News

मिरा-भाईंदरमध्ये लवकरच मेट्रो सुरू होणार; तारीख आणि स्टेशन्सची नावे समोर, सविस्तर जाणून घ्या

Written by:Rohit Shinde
Published:
डिसेंबर अखेर दहिसर ते काशिमिरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मिरा -भाईंदर वासियांसाठी हा एक आनंद क्षण असणार आहे.
मिरा-भाईंदरमध्ये लवकरच मेट्रो सुरू होणार; तारीख आणि स्टेशन्सची नावे समोर, सविस्तर जाणून घ्या

मुंबई आणि उपनगरांतील मेट्रो सेवा ही आजच्या काळातील सर्वात वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बनली आहे. वाढती लोकसंख्या, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वाढणारा वेळ यामुळे मेट्रोचे महत्त्व अधिकच वाढले आहे. मेट्रोमुळे प्रवाशांना वेळेची बचत, आरामदायी प्रवास आणि तिकीट दरातील परवड यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.

उपनगरांमधील मेट्रो जोडण्यामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांत कनेक्टिव्हिटी सुधारली असून दैनंदिन कामावर जाणाऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे. गर्दीच्या वेळेतही मेट्रोची नियमित, वेळेवर आणि सुरक्षित सेवा मिळत असल्याने प्रवाशांचा या सेवेवर विश्वास वाढला आहे. त्यामुळेच मेट्रोकडे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अशा संपूर्ण परिस्थितीत वेगाने नवीन मार्गांचा विस्तार देखील होताना दिसत आहे.

दहिसर ते काशिमिरा मेट्रो सुरू होण्याची शक्यता

डिसेंबर अखेर दहिसर ते काशिमिरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मिरा -भाईंदर वासियांसाठी हा एक आनंद क्षण असणार आहे. तब्बल 14 वर्षाच्या संघर्षपूर्ण पाठपुरावाला यश येत असून सन 2009 मध्ये मिरा -भाईंदर वासियांना दाखवलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे . मंत्री सरनाईक म्हणाले कि, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते  काशिमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदर वासीय मेट्रो ने अंधेरी पर्यंत जाऊ शकतात. तसेच तिथून मेट्रो 1 चा वापर करून  एअरपोर्ट स्थानक 3 मधून थेट कुलाबापर्यंत देखील जाऊ शकतात. त्यामुळे नवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक दक्षिण मुंबई तील मंत्रालय, विधान भवन  येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्क द्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे.

हिसर ते काशिमीरा मेट्रोल ग्रीन सिग्नल मिळाला

दहिसर ते काशिमिरा या नव्या मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. ते मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शुभहस्ते या नवीन मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचे नियोजन येईल. अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

दहिसर – काशिमिरा ही मेट्रो ही डिसेंबर 2026 पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे . त्याबरोबरच वसई- विरार मेट्रो लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई- विरार पासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक ते थेट कुलाबापर्यंत मेट्रोची जाळ्यातून सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकते, असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केलं.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews