Marathi News

हिंजवडीत मेट्रोझिप बससेवा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती; आयटी कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार

Written by:Rohit Shinde
Published:
पुण्यातील मेट्रो झिप बस सेवा ही पुणे मेट्रो प्रकल्पाशी संलग्न असलेली अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक बस सेवा आहे. ही सेवा आता पुन्हा सुरू होत आहे.
हिंजवडीत मेट्रोझिप बससेवा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती; आयटी कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार

पुण्यातील मेट्रो झिप बस सेवा ही पुणे मेट्रो प्रकल्पाशी संलग्न असलेली अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक बस सेवा आहे. ही सेवा प्रवाशांना मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तेथून शहरातील विविध भागांत नेण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. झिप बस सेवा ही मुख्यतः “फीडर सेवा” म्हणून कार्य करते, ज्यामुळे मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनतो. आता ही सेवा पुण्यातील हिंजवडी परिसरात पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. या सेवेमुळे या परिसरात काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

आयटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार!

हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क हे पुणे परिसरातील एक मोठे रोजगार केंद्र आहे. येथे दररोज हजारो कर्मचारी ये-जा करतात. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना ‘मेट्रोझिप’ या खासगी बससेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडी आयटी पार्क आणि आसपासच्या परिसरातील कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या हिंजवडीतील कर्मचाऱ्यांना आता ‘मेट्रोझिप’ या खासगी बससेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही सेवा सप्टेंबर 2025 पासून नव्याने सुरू होणार आहे.

लॉकडाऊनमुळे बंद सेवा कार्यान्वित होणार!

मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ‘मेट्रोझिप’ सेवा थांबवण्यात आली होती. त्यानंतर आयटी कंपन्यांमध्ये ‘हायब्रिड’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’चे प्रमाण वाढल्याने ही सेवा पुन्हा सुरू होऊ शकली नाही. परंतु, अलीकडे कर्मचाऱ्यांची कार्यालयात नियमित उपस्थिती वाढल्याने या सेवेला नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होत आहे.

या बसमध्ये वातानुकूलन, जीपीएस प्रणाली, डिजिटल तिकीट सुविधा आणि महिलांसाठी सुरक्षिततेची विशेष व्यवस्था आहे. सध्या ही सेवा मेट्रोच्या महत्त्वाच्या स्थानकांशी जोडलेली असून हळूहळू ती शहरातील इतर भागांतही विस्तारली जात आहे. ही सेवा वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews